scorecardresearch

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या पुतण्याचा मृत्यू, वादळामुळे दुचाकीवर झाड कोसळून घडली दुर्घटना

अचिन यांच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा पुतण्या अचिन मिश्रा याचा बुधवारी अपघाती मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार अचिन मिश्रा हे निघासनहून लखीमपूरकडे दुचाकीवरून परतत होते. यादरम्यान खांभारखेडाजवळ जोरदार वादळामुळे त्यांच्या दुचाकीवर झाड कोसळले. झाडाखाली दबल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमी अचिनला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अचिन यांच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. अचिन हे केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचे मोठे भाऊ दिनेश मिश्रा यांचा मुलगा आहे. निघासन येथील ते प्रतिष्ठीत व्यापारी होते.


कोण आहेत अजय मिश्रा?

अजय मिश्रा हे २०१९ मध्ये खेरी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. यापूर्वी २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत ते लखीमपूर-खेरीच्या निघासन मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, २०१४ मध्ये भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत खेरी लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले. त्यांनी बसपचे अरविंद गिरी यांचा सुमारे १ लाख १० हजार मतांनी पराभव केला. २०१९ च्या निवडणुकीतही त्यांनी आपली चमकदार कामगिरी करत समाजवादी पक्षाच्या पुर्वी वर्मा यांचा विक्रमी २.५ लाख मतांनी पराभव केला. मिश्रा हे २०१९ मध्ये खेरी लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत.

२०२१ साली मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. तेव्हा ४३ मंत्र्यांनी गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यात अजय मिश्रा यांचाही सामावेश होता. उत्तर प्रदेशातील खेरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार अजय मिश्रा राज्यमंत्री बनले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Union minister ajay mishra teni nephew died in road accident