scorecardresearch

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी माजी मंत्र्यांना घातला वापरलेला मास्क; काँग्रेसची जोरदार टीका

मास्क, स्वच्छता, सोशल डिस्टंसिंग इत्यादींचे नियम पाळण्याची सूचना वारंवार सरकारतर्फे करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी माजी मंत्र्यांना घातला वापरलेला मास्क; काँग्रेसची जोरदार टीका

करोनापासून वाचण्यासाठी सरकारने अनेक मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. मास्क, स्वच्छता, सोशल डिस्टंसिंग इत्यादींची पूर्ण काळजी घेण्याची सूचना वारंवार सरकारतर्फे करण्यात आली आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे मास्क घालणे. हा प्राणघातक विषाणूला आळा घालण्यासाठी मास्क महत्त्वाचा आहे. पण या मास्कसंदर्भात केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मोठे दुर्लक्ष केले आहे.

करोनाचा धोका अजून संपलेला नाही. दरम्यान, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ते गर्दीत उपस्थित आहे. ते अचानक त्यांचा मास्क काढून चक्क दुसऱ्या व्यक्तीला घालताना दिसत आहेत. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा आहे. ज्योतिरादित्य शिंदेंनी ज्या व्यक्तीला मास्क घातला होता ती दुसरी कोणी नसून अटलबिहारी वाजपेयी यांचे पुतणे आणि ग्वाल्हेरचे माजी खासदार अरुण मिश्रा होते.

ज्योतिरादित्य शिंदे ग्वाल्हेरमधील एका कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते. या दरम्यान, जेव्हा ते गर्दीतून जात होते, तेव्हा त्यांना माजी खासदार अरुण मिश्रा भेटले. माजी खासदारांनी मास्क घातला नव्हता. हे पाहून केंद्रीय मंत्र्यांनी त्यांचा मास्क काढून टाकला. केंद्रीय मंत्र्यांनी दोन मास्क घातले होते. त्यांनी त्यांचा सर्जिकल मास्क काढला आणि अरुण मिश्रांना घातला. तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर आता काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने राज्यातील सत्ताधारी पक्ष रॅलींवर लाखो रुपये खर्च करत आहे. केंद्र सरकारचे मंत्री लोकांमध्ये वापरलेले मास्क वाटत आहेत, असे म्हटले आहे.

देशात दररोज करोनाची २५-३० हजार प्रकरणे समोर येत आहेत. केंद्र सरकारने करोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही हे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकार सातत्याने लोकांना करोनाशी संबंधित महत्त्वाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या