United Kingdom : गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे मागील ६ महिन्यांपासून अमेरिका-इराण युद्ध सुरू आहे, तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमध्येही मागील चार वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. या दोन्ही युद्धाबाबत अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. या घडामोडी सुरू असतानाच आता आंतरराष्ट्रीय राजकारणातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
युनायटेड किंगडमचे चार भागांत विभाजन होण्याची शक्यता आहे. स्कॉटलँड, वेल्स आणि आयर्लंडने थेट ‘आझादी’चा नारा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. युनायटेड किंगडममध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. यूकेचे तीन भाग हे इंग्लंडमधून वेगळे होण्याची शक्यता वाढल्यामुळे आता यूकेच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
ब्रिटनमधील केंद्र सरकारला युनायटेड किंगडम (यूके) एकसंध ठेवायचं आहे. मात्र, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंडमध्ये जास्त अधिकार आणि सध्याच्या व्यवस्थेत बदल करण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे आता युनायटेड किंगडमचे तीन भाग वेगळे होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवरच युनायटेड किंगडमच्या तीन विकेंद्रित विधानमंडळांचे स्कॉटलंड, उत्तर आयर्लंड आणि वेल्सच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी सोमवारी एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली आहे. या माध्यमातून वेस्टमिन्स्टर प्रणालीच्या (संसदीय सरकार) नियंत्रणातून मुक्त होण्याचा आपला इरादा जाहीर केला आहे.
The right to decide our own futures is an exciting project. One filled with hope, ambition and opportunity.
— Mary Lou McDonald (@MaryLouMcDonald) September 14, 2026
Today marks an historic moment as Sinn Féin, the SNP and Plaid Cymru come together to stand up for the interests of our nations and their right to independence.
For the… pic.twitter.com/EusBsvFWiD
दरम्यान, या बेटांवरील राजकीय परिस्थिती बदलत असून इतिहासात पहिल्यांदाच स्कॉटलंड, उत्तर आयर्लंड आणि वेल्सच्या प्रथम मंत्र्यांनी (मुख्यमंत्री) युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्यासाठी वचनबद्ध असल्याची भूमिका मांडली आहे. या ऐतिहासिक करारावर स्कॉटलंडचे प्रथम मंत्री (मुख्यमंत्री) जॉन स्विनी, वेल्सचे प्रथम मंत्री (मुख्यमंत्री) रुन एपी इओरवेर्थ आणि उत्तर आयर्लंडच्या प्रथम मंत्री (मुख्यमंत्री) मिशेल ओ’नील यांनी कार्डिफमधील एका शिखर परिषदेत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
तसेच आयर्लंडमधील विरोधी पक्षनेत्या तथा सिन फेनच्या (उत्तर आयर्लंडमधील एक प्रमुख राजकीय पक्ष) अध्यक्षा मेरी लू मॅकडोनाल्ड या चौथ्या स्वाक्षरीकर्त्या आहेत. “आपल्या राष्ट्रांना आत्मनिर्णयाचा अधिकार आहे. कोणत्याही वेस्टमिन्स्टर (संसदीय सरकार) सरकारला लोकशाही रोखण्याचा किंवा आमचे लोक त्यांचं भविष्य स्वतः ठरवतील, या तत्त्वाला कमी लेखण्याचा अधिकार नाही”, असं या करारात म्हटलं आहे.
दरम्यान, युनायटेड किंगडममधील तीन प्रमुख घटक असलेल्या स्कॉटलंड, उत्तर आयर्लंड आणि वेल्सने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ऐतिहासिक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे आता युनायटेड किंगडमसमोर स्वतःचं अखंडत्व टिकवून ठेवण्यासाठी मोठं आव्हान निर्माण झालं आहे. या घडामोडीमुळे ब्रिटनमधील वेस्टमिन्स्टरचं राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
