scorecardresearch

पाकिस्तानला F-16 विमानांसाठी अमेरिकेकडून ४५० अब्ज डॉलर्स, भारताने नोंदवला तीव्र निषेध

२०१८ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांपासून सुरक्षेसाठी देण्यात येत असलेली २ अब्ज डॉलर्सची मदत रद्द केली होती

पाकिस्तानला F-16 विमानांसाठी अमेरिकेकडून ४५० अब्ज डॉलर्स, भारताने नोंदवला तीव्र निषेध
फोटो सौजन्य-(इंडियन एक्स्प्रेस)

F-16 Fighter Jet Fleet: अमेरिकेने पाकिस्तानला F-16 लढाऊ विमानांसाठी तब्बल ४५० अब्ज डॉलर्सचे पॅकेज मंजुर केले आहे. या पॅकेजबाबत भारताने अमेरिकेकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. अमेरिकेचे दक्षिण आणि मध्य आशियाचे सहाय्यक सचिव डोनाल्ड लू यांच्याकडे भारताने या निर्णयाची वस्तुस्थिती आणि वेळेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

लडाखमध्ये सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू; पाच दिवसांचा कालावधी, अधिकाऱ्यांना सावधगिरीचे आदेश

जो बायडन सरकारने पाकिस्तानला दहशतवाद्यांपासून असलेल्या भविष्यातील धोक्यापासून बचावासाठी हे पॅकेज जाहीर केले आहे. गेल्या चार वर्षात अमेरिकेने सुरक्षा क्षेत्रासाठी पाकिस्तानला केलेली ही सर्वात मोठी मदत आहे. २०१८ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांपासून सुरक्षेसाठी देण्यात येत असलेली २ अब्ज डॉलर्सची मदत रद्द केली होती. पाकिस्तानला अफगाणिस्तानातील तालिबान आणि हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांवर अंकुश ठेवण्यात आलेल्या अपयशानंतर ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतला होता.

राणीच्या निधनाचे वृत्त देताना मागे मोबाईलवर फोटोसेशन चाललेलं; ‘बीबीसी’वर टीकेचा भडीमार

दरम्यान, सागरी सुरक्षेवर चर्चा करण्यासाठी भारताने ७ सप्टेंबरला अमेरिकेसोबत द्विपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत डोनाल्ड लूदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर काही दिवसातच अमेरिकेने पाकिस्तानसाठी हे पॅकेज जाहीर केले आहे. “दहशतवादविरोधी लढ्यात पाकिस्तान महत्त्वाचा देश आहे. F-16 कार्यक्रम हा अमेरिका आणि पाकिस्तानच्या द्विपक्षीय संबंधांचा एक महत्त्वाचा भाग आहे. याबाबत दिर्घकालीन धोरणानुसार अमेरिकेने पाकिस्तानसाठी हे पॅकेज जाहीर केले” अशी माहिती अमेरिकेच्या प्रवक्त्याने दिली आहे.  F-16 लढाई विमानांच्या पॅकेजमध्ये  कोणतेही शस्त्र किंवा युद्ध सामुग्री समाविष्ट नाही, असे स्पष्टीकरण अमेरिकेकडून देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या