व्हिडिओ पाहून प्रसुती करण्याचा प्रयत्न, अविवाहित तरूणीचा दुर्दैवी मृत्यू

ही युवती मोबाइलवर बाळाला जन्म देण्याच्या प्रक्रियेचा एक व्हिडिओ पाहत स्वत:ची प्रसुती करत होती.

(संग्रहित छायाचित्र)

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील बिलंदपूर शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एकट्याने बाळाला जन्म देण्याचा प्रयत्न करताना एका २५ वर्षीय अविवाहित तरुणीचा मृत्यू झाला आहे. ही युवती मोबाइलवर बाळाला जन्म देण्याच्या प्रक्रियेचा एक व्हिडिओ पाहत स्वत:ची प्रसुती करत होती. ती बहराईच येथील रहिवासी होती आणि मागील ४ वर्षांपासून गोरखपूर येथे राहत होती. ही युवती स्पर्धा परिक्षेची तयारी करत होती.

पोलिसांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी या युवतीने बिलंदपूर येथील एका भागात भाड्याने एक खोली घेतली होती. रविवारी इतर भाडेकरूंना तिच्या खोलीतून रक्त येताना दिसले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना ती युवती आणि बाळ रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. पोलिसांनी मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठवले.

केंट पोलीस ठाण्याचे एसएचओ रवी राय म्हणाले की, या युवतीचे वय २५ वर्षे असून ती अविवाहित होती. ती आपल्या खोलीत एकट्यानेच बाळाला जन्म देण्याचा प्रयत्न करत होती. यातच तिचा मृत्यू झाला आहे. ती चार दिवसांपूर्वीच तिथे भाड्याने राहायला आली होती. ती मागील चार वर्षांपासून गोरखपूर येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करत होती. याप्रकरणी अद्याप तिच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केलेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Unmarried pregnant woman died when trying delivery to watching video gorakhpur

ताज्या बातम्या