करोना महामारीमुळे अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना परत येण्यास परवानगी देण्यास चीनच्या अनास्थेबद्दल भारताने निराशा व्यक्त केली आहे. हा प्रकार मानवतावादी समस्येसाठी अवैज्ञानिक दृष्टिकोन असल्याचंही भारताने म्हटलंय. २३ हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी, बहुतांशी औषधीशास्त्राचे शिक्षण घेणारे, शेकडो भारतीय व्यापारी आणि कामगार त्यांच्या कुटुंबासह भारतात एक वर्षाहून अधिक काळ अडकून पडले आहेत. या अडकून पडलेल्या लोकांची व्हिसा प्रक्रिया चीनने करोन परिस्थितीचा हवाला देत स्थगित केली आहेत.

चीनमध्ये सर्वप्रथम २०१९च्या अखेरीस पहिल्यांदा करोनाची नोंद झाली होती. त्यानंतर चीनमध्ये राहणारे बरेच भारतीय मायदेशी आले होते. चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिश्री यांनी २३ सप्टेंबर रोजी चीन-भारत संबंधांवरील चौथ्या उच्च स्तरीय बैठकीत या अडकलेल्या भारतीयांच्या समस्यांचा उल्लेख केला होता. “ही समस्या साधीशी असून त्याला पूर्णपणे मानवतावादी संदर्भ आहे आणि त्या द्विपक्षीय संबंधांशी जोडलेल्या नाहीत. जसे विद्यार्थी, शेकडो भारतीय व्यापारी आणि कामगार त्यांच्या कुटुंबासह भारतात एक वर्षाहून अधिक काळ अडकून पडले आहेत, त्यांना परत चीनमध्ये पाठवणं,” असं मिस्त्री म्हणाले. 

स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज ऑफ सिचुआन युनिव्हर्सिटी (SCU), चायना सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीज आणि मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिस (MP-IDSA) यांनी ही बैठक आयोजित केली होती. “भारतीय विद्यार्थी, व्यापारी, सागरी क्रू आणि निर्यातदारांना सध्या काही समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याच्या संदर्भात चीनचा दृष्टिकोन पाहून आम्ही निराश झालो आहोत,” असे राजदूत विक्रम मिश्री म्हणाले.