नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी आज (गुरूवार) पाकिस्तानशी चर्चा केली जावी यासाठी आग्रही भूमिका मांडली. जोपर्यंत तुम्ही पाकिस्तानशी चर्चा करत नाही , आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये कधीही शांतपणे राहू शकत नाही.
त्यांनी म्हटलं की, भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्री असती, तर लोक इथं सियालकोट(पाकिस्तान) वरून इथे चहा पिण्यासाठी आले असते. आम्ही तिथे (सियालकोट) गेलो असतो. पूर्वी असं होत होतं, स्वातंत्र्यापूर्वी लोक रेल्वेद्वारे येत होते.
तसेच, मी आजही खात्रीने सांगू इच्छितो की, जोपर्यंत तुम्ही (भारत) पाकिस्तानशी चर्चा करत नाही आणि एकमेकांशी मैत्रीपूर्ण हात मिळवत नाही, तोपर्यंत आम्ही कधीच शांतीने राहू शकत नाही, माझ्याकडून हे लिहून घ्या.
“…हा निव्वळ काश्मीरमधलं शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न”; माजी मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच झालेल्या नागरी हत्यांमध्ये काश्मिरींचा सहभाग नाही, असे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी या अगोदर सांगितले होते. काश्मिरींना बदनाम करण्याच्या षडयंत्राखाली हे हल्ले करण्यात आले. केंद्रशासित प्रदेशातील शांततामय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले होते.