scorecardresearch

Premium

उत्तराखंड: मंदिरात गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपा खासदाराविरुद्ध गुन्हा

उत्तर प्रदेशच्या आवलाचे खासदार धर्मेंद्र कश्यप उत्तराखंडच्या जागेश्वर धाममध्ये दर्शनासाठी आले होते. त्यांच्यावर मंदिरातील पुजाऱ्यांना शिवीगाळ आणि गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

BJP-MP-Dharmendra-Kashyap
उत्तराखंड: मंदिरात गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपा खासदाराविरुद्ध गुन्हा (Photo: Twitter/@dkashyap24aonla)

उत्तर प्रदेशच्या आवलाचे खासदार धर्मेंद्र कश्यप उत्तराखंडच्या जागेश्वर धाममध्ये दर्शनासाठी आले होते. मंदिरातील पुजाऱ्यांना शिवीगाळ आणि गैरवर्तन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. करोना काळात घातलेल्या निर्बंधामुळे मंदिर बंद करण्याची वेळ झाली असल्याचं पुजऱ्यांनी खासदारांना सांगितलं. मात्र म्हणणं ऐकून घेण्याऐवजी त्यांना दम आणि शिवीगाळ केल्याची तक्रार मंदिर प्रशासनाने पोलिसात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार ३१ जुलैला घडला. खासदार धर्मेंद्र कश्यप आणि तिघे जण दुपारी ३.३० च्या दरम्यान मंदिरात आले होते. त्यांनी संध्याकाळी ६.३० पर्यंत मंदिरात ठाण मांडलं होतं. हे मंदिर करोना निर्बंधामुळे संध्याकाळी ६ वाजता बंद होतं. मंदिर प्रशासनाने केलेल्या तक्रारीनुसार, पुजाऱ्यांनी खासदारांना मंदिरातून बाहेर जाण्याची विनंती केली. मात्र त्यांनी गैरवर्तन करत शिवीगाळ केली. या प्रकरणी खासदार धर्मेंद्र कश्यप आणि तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलम ५०४ आणि १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
Gunratna sadavarte
“गांधींचे विचार संपले, या देशात आता नथुराम…”, गुणरत्न सदावर्ते बरळले; म्हणाले, “भारताचे तुकडे…”

गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या नंतर काँग्रेसने भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. उत्तराखंडचे काँग्रेस नेते गोविंद सिंह कुंजवाल यांनी भाजपा खासदाराच्या गैरवर्तवणुकीनंतर ठिय्या आंदोलन केलं. दुसरीकडे उत्तराखंडचे भाजपा अध्यक्ष मदन कौशिक यांनी याप्रकरणी माहिती नसल्याचं सांगितलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Up bjp mp misconduct in uttarakhand temple complaint register rmt

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×