उत्तर प्रदेश विधानसभा : “सिर्फ मोदीजी का नाम ही काफी है”; भाजपा उपाध्यक्षांनी केला विजयाचा दावा

२०१३-१४  मध्ये पंतप्रधान मोदींवर उत्तर प्रदेशातील लोकांचे जितके प्रेम होते तितकेच अजूनही आहे असे शर्मा यांनी म्हटले

Up bjp vice president ak Sharma says pm modi name enough to win 2022 state polls
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यशस्वी प्रवासाचा छोटासा भाग असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले

भाजपाने उत्तर प्रदेशातील २०२२ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. उत्तर प्रदेश भाजपाचे नवे उपाध्यक्ष म्हणून एके शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०१३-१४ मध्ये उत्तर प्रदेशातील लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जेवढे प्रेम करत होते तितकेच आताही करतात असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आणि त्यांचे आशीर्वाद आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी पुरेसे असतील असेही त्यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील लोकांचे मोदींवर प्रेम

“माझ्या मते, २०१३-१४  मध्ये पंतप्रधान मोदींवर उत्तर प्रदेशातील लोकांचे जितके प्रेम होते तितकेच अजूनही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आणि त्यांचे आशीर्वाद आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी पुरेसे असतील. ते एक जननेते आहेत. त्यांच्यासोवबत आमच्याकडे पक्षाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद आहेत, असे शर्मा यांनी म्हटले आहे. माजी आयएएस अधिकारी एके शर्मा यांनी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांना हे पत्र लिहिले आहे.

विधानसभा निवडणुकीत पूर्वीपेक्षा जास्त जागा

विधानसभा निवडणुकीत मी सर्वतोपरी विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करेन. या व्यतिरिक्त मी माझ्या सहकाऱ्यांनाही यासाठी प्रेरणा देईन असे शर्मा म्हणाले. एके शर्मा यांनी हे पत्र ट्विटरवरही शेअर केले गेले आहे. उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाचेही शर्मा यांनी कौतुक केले आहे. “माझा ठाम विश्वास आहे की आपल्या आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळतील,” असे शर्मा म्हणाले.

ए.के. शर्मा यांनी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह व केंद्रीय नेतृत्वाचे प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल आभार मानले आहेत. पक्षाचे सदस्य म्हणून मी पुन्हा सांगत आहे की मी देशहितासाठी योगदान देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे शर्मा यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यशस्वी प्रवासाचा छोटासा भाग असल्याचे मत

या पत्रात शर्मा यांनी आय.ए.एस. असताना केलेल्या कामांचा देखील उल्लेख केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर २० वर्षे काम करण्याचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. शर्मा २००१ ते २०२१ या काळात मी विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांचे सहाय्यक म्हणून काम केले. गुजरातचे मुख्यमंत्री होण्यापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रवासात मी त्यांच्याबरोबर होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या यशस्वी प्रवासाचा मी एक छोटासा भागही आहे आणि त्यांनी कृपेने मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी दिली असे शर्मा यांनी म्हटले आहे.

शनिवारीच एके शर्मा यांना उत्तर प्रदेश भाजपाच्या युनिटचे उपाध्यक्ष बनविण्यात आले. शर्मा हे राज्याच्या विधानपरिषदेचे सदस्य देखील आहेत. उत्तर प्रदेशचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी एके शर्मा यांच्या नियुक्तीची माहिती दिली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Up bjp vice president ak sharma says pm modi name enough to win 2022 state polls abn