VIDEO: आधी महिलेचा पाठलाग, मग फरफटत नेलं, उत्तर प्रदेशच्या व्हायरल व्हिडीओने खळबळ

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात एका महिलेचा २ जणांनी आधी पाठलाग केला आणि नंतर अक्षरशः फरफटत नेल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय.

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात एका महिलेचा २ जणांनी आधी पाठलाग केला आणि नंतर अक्षरशः फरफटत नेल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झालाय. यानंतर उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांवर सडकून टीका होत आहे. वाढता दबाव पाहता पोलिसांनी या महिलेचा शोध सुरू करून गुन्हा नोंदवला आहे.

नेमकं काय घडल?

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, “मी कामानिमित्त खुर्जनगर येथील माझ्या नातेवाईकांना भेटायला गेले होते. यावेळी माझ्या नातेवाईकांनी माझा छळ केला आणि त्यामुळे मी तेथून पळून गेले. मात्र, पळून जाताना दोघांनी मला पकडलं आणि माझ्यावर अत्याचार केला.”

सीसीटीव्हीत काय दिसतंय?

सीसीटीव्हीवरील तारखेप्रमाणे ही घटना २४ नोव्हेंबरला रात्री १० वाजून ५९ मिनिटांनी घडली. यात एक महिला पळत येते आणि एक दरवाजा ठोठावत असल्याचं दिसतं. मात्र, तेवढ्यात दोन जण येऊन या महिलेला दरवाजासमोरून खेचतात आणि खाली पाडतात. त्यानंतर ते या महिलेला जमिनीवरून अक्षरशः फरफटत नेताना दिसतात.

हेही वाचा : “खास आरोपीला फायदा व्हावा म्हणून प्रयत्न”, सर्वोच्च न्यायालयानं योगी सरकारला फटकारलं

आरोपींनी महिलेवर अत्याचार करून तिला बुलंदशहातील एका शाळेजवळ सोडून दिलं. तसेच झालेल्या प्रकाराची तक्रार केल्यास त्याचे परिणाम भोगण्याचीही धमकी पीडित महिलेला देण्यात आली. पोलिसांनी आरोपींविरोधात विनयभंग, अत्याचार आणि धमकी या कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Up cctv footage viral on social media showing 2 men dragging women pbs

Next Story
देशभर सतर्कता! ; ‘ओमिक्रॉन’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी पंतप्रधानांचे निर्देश
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी