Yogi Adityanath On Mandir-Masjid Debate : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला वारसा परत घेण्यात काहीही गैर नाही असे विधान केले आहे. प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज तकला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी मंदिर-मशीद वादावर भाष्य केले आहे.

“आपला वारसा परत घेणं वाईट गोष्ट नाही. संभलमध्ये सनातनचे पुरावे दिसत आहेत. त्यामुळे वादग्रस्त वास्तूंना मशीद म्हटले जाऊ नये. भारत मुस्लिम लीगच्या मानसिकतेने चालणार नाही”, शाही जामा मशीद वादाचा संदर्भ देत योगी आदित्यनाथ यांनी हे विधान केले. या वादाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील संभलमध्ये काही दिवसांपूर्वी हिंसाचाराची घटना घडली होती.

Amit Shah in shirdi
Amit Shah : “शरद पवारांच्या दगाफटक्याच्या राजकारणाला २० फूट जमिनीत गाडलं”, अमित शाहांचा शिर्डीतून एल्गार; उद्धव ठाकरेंवरही टीका!
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Image of Yogi Adityanath
Mandir-Masjid Debate: “वक्फ बोर्डाच्या नावाखाली घेतलेल्या प्रत्येक इंच जमिनीचा ताबा परत घेणार”, योगी आदित्यनाथ यांचा इशारा
Aaditya Thackeray On Mumbai University Senate Election 2024
Maharashtra Breaking News : ठाकरे गटाच्या देवेंद्र फडणवीसांशी भेटीगाठी वाढल्या? यामागे नेमकं काय? आदित्य ठाकरे म्हणाले…
AICC Headquarters at 24, Akbar Road, New Delhi (PTI Photo/
Congress : २४, अकबर रोड; हा काँग्रेसचा पत्ता सुमारे पाच दशकांनी बदलणार, १५ जानेवारीला नव्या मुख्यालयाचा उद्घाटन सोहळा
Mamata Banerjee Abhishek Banerjee cold war
TMC : तृणमूल काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप होणार? ममता बॅनर्जी आणि अभिषेक यांच्यातील ‘कोल्ड वॉर’ चर्चेत
Baahubali Beed Murder in Beed News
बाहुबलींचे बीड: अराजकाचे वर्तुळ!
loksatta editorial on Islamic terrorism
अग्रलेख : खरोखरच खतरे में…

आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी मंदिर-मशीद वादाबद्दल चिंता व्यक्त केली होती, तसेच लोकांना अशा मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला होता, त्यानंतर आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केले आहे.

शाही जामा मशि‍दीच्या सर्वेक्षणाचा न्यायालयाच्या आदेशानंतर संभलमध्ये हिंसाचार झाला होता. यावर बोलताना आदित्यनाथ यांनी पुराणात भगवान विष्णूचा दहावा अवतार असलेल्या कल्कीचे जन्मस्थान म्हणून संभलचा उल्लेख असल्याचे सांगितले. संभाल येथे झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला होता तर २० हून अधिक जण जखमी झाले होते.

“१५५६ मध्ये संभालमधील हरिहर मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले आणि एक वास्तू उभी करण्यात आली. याचा उल्लेख आईना-ए-अकबरीमध्येही आहे”, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

हेही वाचा>> Mandir-Masjid Debate: “वक्फ बोर्डाच्या नावाखाली घेतलेल्या प्रत्येक इंच जमिनीचा ताबा परत घेणार”, योगी आदित्यनाथ यांचा इशारा

या प्रकरणात याचिकाकर्त्याने दावा केला आहे की ‘बाबरनामा’ आणि ‘आईना-ए-अकबरी’मध्ये सांगण्यात आले आहे की जामा मशीद ज्या ठिकाणी उभी आहे तेथे हरिहर मंदीर होते. आईना-ए-अकबरी हा अकबराच्या राजवटीतील मुघल साम्राज्यातील प्रशासनासंबंधी एक दस्तऐवज आहे. अकबराच्या दरबारात असणारे इतिहासकार अबुल फझल यांनी ते लिहिले होते.

योगी आदित्यनाथ यांनी गंगा नदीच्या स्वच्छेतेच्या मुद्द्यावर समाजवादी पक्षावर देखील टीका केली. त्यांनी दावा केली की मॉरिशसच्या पंतप्रधानांनी २०१३ मध्ये कुंभ मेळ्याला भेट दिली होती. पण तेव्हा तेथील अस्वच्छता पाहून त्यांनी पवित्र गंगेत स्नान करण्याचे टाळले होते.

Story img Loader