scorecardresearch

“…तर पुढच्या चौकात यमराज त्याची वाट बघत असेल”, महिला सुरक्षेवरून योगी आदित्यनाथ आक्रमक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथील कार्यक्रमात महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून आक्रमक वक्तव्य केलं आहे.

UP CM Yogi Adityanath
योगी आदित्यनाथ यांनी रविवारी गोरखपूरमध्ये अनेक विकासकामांची पायाभरणी केली. (PC : Yogi Adityanath Twitter)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी (१७ सप्टेंबर) रात्री गोरखपूरच्या मानसरोवर येथील रामलीला मैदानात आयोजित एका शासकीय कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी ३४३ कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. तसेच अनेक विकासकामांचं उद्घाटनही केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी राज्याचा विकास, लोककल्याण, कायदा आणि सुव्यवस्थेवर भाष्य केलं. यावर बोलताना आदित्यनाथ म्हणाले कायदा हा आपल्या संरक्षणासाठी आहे. परंतु कायदा हाताशी धरून कोणी आपल्या व्यवस्थेशी खेळ केला तर त्याची गाठ आमच्या सरकारशी आहे.

योगी आदित्यनाथ म्हणाले, आपल्या सुरक्षेसाठी कायदा आहे. परंतु, कोणी जर आया-बहिणींचा विनयभंग केला तर पुढच्या चौकात यमराज त्याची वाट बघत असेल. त्याला यमराजाकडे पाठवण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. आपल्याला या राज्यातील जनतेला उत्तम सुरक्षा प्रदान करायची आहे. कायदा हा आपल्या संरक्षणासाठी आहे. परंतु, याच कायद्याला हाताशी धरून कोणीही कोणाच्याही सुरक्षेशी तडजोड करण्याचा प्रयत्न करू नये.

gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, आपलं सरकार कोणताही भेदभाव न करता विकासकामं, लोककल्याणकारी योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहे. शासन त्यांचं काम चोख बजावत आहे, तर नागरिकही त्यांचं कर्तव्य बजावताना दिसतात. त्यामुळे विकासकामात अडथळे निर्माण करणारे आपोआपो उघडे पडत आहेत. विकास प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्याचं कामही आपण करत आहोत.

हे ही वाचा >> “…तर ‘शिवसेना’ शिंदे गटाला देण्याचा निर्णय रद्द होईल”, घटनातज्ज्ञांनी मांडलं गणित; वाचा सविस्तर

योगी आदित्यनाथ म्हणाले, विकासकामांना आपलं सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे. विकासकामं करताना, वेगवेगळ्या योजना राबवताना कोणत्याही स्तरावर दुर्लक्ष होता कामा नये, याची काळजी सरकार घेत आहे. यात कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. राज्यातली विकासकामं ही दर्जेदारच असली पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 12:22 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×