समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज लखनौमध्ये २२ नैसर्गिक सुगंधांनी बनलेला समाजवादी परफ्यूम लाँच केला. त्याच्या बाटलीचा रंग पक्षाच्या झेंड्यासारखा लाल आणि हिरवा आहे. यावेळी अखिलेश यांनी मुख्यमंत्री योगींचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. ते म्हणाले, “जर त्यांना (योगींना) हा परफ्यूम मिळाला तर ते त्याचा सुगंध बदलू शकणार नाहीत पण रंग नक्कीच बदलतील.”

परफ्यूम बनवणाऱ्या समाजवादी पक्षाचे नेते पम्मी जैन कन्नौजमधील परफ्यूम व्यापारी आहेत. परफ्यूम बनवण्यात अखिलेश यादव यांचे विचार असल्याचे त्यांनी सांगितले. समाजवादी पार्टी कार्यालयात समाजवादी परफ्यूम लाँच करण्यात आला. अखिलेश यादव आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी मंचावरून त्यांच्या हातात  परफ्यूमच्या कुपी दाखवल्या. 

अखिलेश यादव म्हणाले की, “खूप चांगला परफ्यूम बनवला आहे. ज्यांना याचा सुगंध येतो, ते समाजवादी पक्ष आणि समाजवादी विचारसरणीची आठवण करून देतील. रंगही लाल हिरवा ठेवला आहे. ही बाटली इतरत्र कुठे गेली तर तिचा सुगंध बदलू शकत नाही मात्र रंग नक्कीच बदलणार.”

अखिलेश यादव यांनी कोणाचेही नाव न घेता म्हटले की, “पत्रकार हे परफ्यूम घेऊन जातील तेव्हा कळेल की आता कोणाचे सरकार येणार आहे. पत्रकार परफ्यूम सोबतीला जिथे घेऊन जातील तेव्हा तिथेही समाजवादी सुगंध पोहोचेल आणि त्यांना कळेल कोण येणार आहे?”