जन्मदात्रीनेच पाजलं तिन मुलांना विष, पतीशी वादानंतर उचललं टोकाचं पाऊल, उत्तर प्रदेशच्या गाझीपुरातील घटना

उपचारादरम्यान तिनही मुलांचा मृत्यू, ३५ वर्षीय आरोपी महिलेला अटक

जन्मदात्रीनेच पाजलं तिन मुलांना विष, पतीशी वादानंतर उचललं टोकाचं पाऊल, उत्तर प्रदेशच्या गाझीपुरातील घटना
(सांकेतिक छायाचित्र)

पतीशी झालेल्या वादातून ३५ वर्षीय महिलेने आपल्या तीन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यातील दधाणी भानमाल राय या गावातली ही घटना आहे. सुवहाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला आहे. सुनिता यादव असे आरोपी महिलेचे नाव आहे. आरोपीने विष दिल्यानंतर उपचारादरम्यान अत्यवस्थ तिनही मुलांचा मृत्यू झाला आहे.

आमदार संतोष बांगर यांनी मारहाण का केली? व्यवस्थापकानं दिलं स्पष्टीकरण; सर्व आरोपही फेटाळले, म्हणाले…

आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमांशू (वय ११ वर्ष), प्रियांशू (वय ८ वर्ष) आणि दिव्यांशी (वय ७ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. रेवातीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सयितबांध भागात राहणाऱ्या बलेश्वर यादव यांच्याशी आरोपी सुनिताचा विवाह झाला होता. रक्षाबंधनानिमित्त सुनिता माहेरी आली होती. याचदरम्यान १३ ऑगस्टला पती आणि दिरासोबत तिचा जोरदार वाद झाला. याच रागातून तिने तिच्या तिनही मुलांना विष पाजले. प्रकृती बिघडल्याने सुनिताच्या माहेरच्यांनी या मुलांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रियांशूला मृत घोषित करण्यात आले.

“..मग खुर्चीत कसे बसणार? पलंगावर कसे झोपणार?” फोनवर ‘हॅलो’ म्हणण्यावरून काँग्रेसचा शिंदे सरकारला खोचक टोला!

इतर दोन मुलांची गंभीर परिस्थिती पाहता डॉक्टरांनी त्यांना वाराणसीला हलवण्यास सांगितले. उपचारादरम्यान वाराणसीत या दोनही मुलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी महिलेच्या चौकशीनंतर तिला अटक करण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
उत्तरप्रदेशमध्ये तिरंगा यात्रेत नथुराम गोडसेचे छायाचित्र; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी