उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बुलडोझर हा चर्चेचा विषय होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जे चुकीचे काम करतात, सरकारी जमिनीवर ताबा मिळवतात किंवा बेकायदेशीरपणे बांधकाम करतात त्यांच्यावर बुलडोझर चालविला जाईल, असे म्हटले होते. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या दणदणीत विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा बुलडोझर फिरू लागला आहे. बेकायदा बांधकामे बुलडोझरने पाडण्याचे काम सुरू झाले आहे.

आग्रा येथील मॉल रोडवरील अँथनी गर्ल्स स्कूलने नोटीस देऊनही बेकायदा बांधकाम न हटवल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पथकाने शनिवारी शाळेच्या आवारातील सायकल स्टँड, स्टेज आणि गार्ड रुमचे बांधकाम बुलडोझरने जमीनदोस्त केले. सुट्टीच्या दिवशीही केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. शाळा प्रशासनाला वेळ न देता ही कारवाई करण्यात आल्याचे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. तर यानंतर पुन्हा एकदा पुढील पाच वर्षे सरकारी जमिनीवर किंवा बेकायदा बांधकामांवर बुलडोझर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
BJP, Jats, Thakurs, anger of the Jats ,
पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला जाट, ठाकुरांच्या रागाची धास्ती
NIA team attacked in Bengal
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात ट्विस्ट; अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत

आग्राच्या बालुगंजमध्ये सेंट अँथनी गर्ल्स स्कूल आहे. ही शाळा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अंतर्गत येते. शाळेच्या आत बेकायदा बांधकाम करण्यात आले होते, याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाला कळताच शनिवारी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पथक हे बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी शाळेत पोहोचले. शाळेत बांधलेले बेकायदा बांधकाम कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पथकाने बुलडोझरच्या साह्याने पाडले. मात्र, शाळा व्यवस्थापनाने बेकायदा बांधकाम पाडण्यास विरोध दर्शवला आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाने बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई केली असता शाळा व्यवस्थापनानेही त्याला विरोध केला. एकीकडे सरकार बेटी बचाओ बेटी पढाओच्या गप्पा मारते, तर दुसरीकडे त्याच सरकारचे कर्मचारी शाळा पाडण्याचे काम करत आहेत, असे शिक्षकांनी म्हटले आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अभियंता संजय सिंह यांनी सांगितले की, सेंट अँथनी शाळेच्या गेटवरच स्टेज, सायकल स्टँड आणि गार्ड रूम बांधण्यात आले होते. ही बेकायदा बांधकामे हटविण्याबाबत कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून दोन वेळा नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र शाळा प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. ७ मार्च रोजी शेवटची नोटीस देण्यात आली होती. शाळेने ११ मार्चपर्यंत मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर शनिवारी पथकाने लष्कर पोलिसांसह बुलडोझरच्या सहाय्याने तिन्ही बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली.