Barabanki Uttar Pradesh Suicide Case : पत्नीच्या कुटुंबाच्या छळाला कंटाळून एका २५ वर्षीय तरुणाने उत्तर प्रदेशातील बारांबकी येथे आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हमारी अधुरी कहाणी अशा आशयाची फेसबूक पोस्ट केल्यानंतर त्याने आत्महत्या केली. या दोघांचं कोर्ट मॅरेज झालं होतं. त्याने त्याच्या मॅरेज सर्टिफिकेटसह लग्नाचा फोटोही फेसबुकवर शेअर केलाय. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सुधीर आणि कोमल चार वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. तसंच, सहा महिन्यांपूर्वी त्यांनी कोर्टात लग्न केलं. परंतु, कोमलचे नातेवाईक या नात्याला विरोध करत होते आणि सुधीरचा छळ सुरू होता, असा आरोप त्याने सुसाईड नोटमध्ये केला आहे. त्याने लिहिले की त्याचा रूममेट आयुष हा कोमलचा भाऊ होता आणि त्याने सुरुवातीला त्यांच्या नात्याचे समर्थन केले होते. मात्र कोमलच्या आई-वडिलांनी विरोध केला आणि छळ करायला सुरुवात केली.

how to check car tyre conditions tips to know tyre air pressure car tips
‘या’ गोष्टींकडे करू नका अजिबात दुर्लक्ष! नाहीतर चालत्या गाडीचा फुटेल टायर…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Sudesh Bhosale
सुदेश भोसलेंनी सांगितलं आशा भोसले यांच्याबरोबरचं नातं; किस्सा सांगत म्हणाले, “तेव्हापासून मी त्यांना आई…”
Healthy Lifestyle Tips
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना घ्या ‘या’ ४ गोष्टींची काळजी; अन्यथा आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
valentines day chaturang article
नात्यांची नवी वळणदार वळणे
kaumudi walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या पतीने शेअर केले लग्नातील फोटो; म्हणाला, “लग्नसंस्कारांकडे…”
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”

हेही वाचा >> Crime News : धक्कादायक! पैशांच्या बदल्यात मित्रांना पत्नीवर करू दिला बलात्कार… सौदीत बसून पाहायचा व्हिडीओ; गुन्हा दाखल

कोमलने कोर्ट मॅरेज केलं अन्…

कोमलने सुधीरच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. तिच्या सांगण्यावरूनच दोघांनी लग्न केलं होतं. यानंतर कोमलने त्यांच्या कोर्ट मॅरेजबद्दल घरी सांगितलं. त्यानंतर काय झालं माहीत नाही, पण तिने माझ्याशी बोलणं बंद केलं, असं सुधीरने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलंय. तसंच, कोमलच्या आईने आणि तिच्या भावाने मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचंही त्याने चिठ्ठीत लिहिलंय.

आज सकाळी सुधीरचा मृतदेह घराजवळील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. कोमलच्या आई-वडिलांची इच्छा होती की त्याने घटस्फोटासाठी सहमती द्यावी. घटस्फोटासाठी कोमलचे आई-वडिल सुधीरला वारंवार फोन करत होते. पण कोमलने सांगितल्याशिवाय तो घटस्फोटासाठी पुढे जाणार नाही, असं त्याने ठणकावून सांगितलं होतं, असं सुधीरच्या भावाने सांगितलं. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे पोलीस अधिकारी संतोष कुमार यांनी सांगितले. सुधीरच्या कुटुंबीयांनी तक्रार नोंदवली असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader