भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने देशपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षाबरोबर मैदानात उतरणार आहे. उत्तर प्रदेशच्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस समाजवादी पक्षाबरोबर युती करेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस केके शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी मंगळवारी लखनऊ येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

केके शर्मा मंगळवारी लखनऊमध्ये होते. उत्तर प्रदेश प्रेस क्लबमध्ये शर्मा यांनी माध्यमांना सांगितले की, उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी मुख्य विरोधी पक्ष समाजवादी पक्षाच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू केले असल्याचे ते म्हणाले.

Jayant Patil on Amit Shah
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका
Shivsena, NCP, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची फरफट, नाराजीची पटोलेंकडून कबुली
Sanjay Kokate of Shiv Sena Shinde group is join NCP Sharad Pawar group
शिवसेना शिंदे गटाचे संजय कोकाटे राष्ट्रवादी शरद पवार गटात
Supriya Sule Vs Sunetra Pawar
ठरलं! बारामतीत नणंद-भावजयीचा सामना, सुप्रिया सुळेंचं नाव जाहीर होताच सुनेत्रा पवारांच्या नावाचीही घोषणा

“महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसारखं उत्तर प्रदेशात देखील भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. येथे समाजवादी बरोबर आम्ही एकत्र निवडणुका लढवू आणि भाजपाला रोखू,” असे केके शर्मा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा- शरद पवार दिल्लीत ममता बॅनर्जींची भेट घेण्याची शक्यता; विरोधकांच्या आघाडीवर चर्चा होणार?

भाजपा सरकार लोकशाहीला धोका निर्माण करीत आहे

शर्मा म्हणाले की, “पक्षप्रमुख शरद पवार यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, राष्ट्रवादीला उत्तर प्रदेशातील तरुण आणि शेतकऱ्यांचा आवाज उठवावा लागेल कारण तेथील भाजपा सरकार लोकशाहीला धोका निर्माण करीत आहे. जो कोणी आवाज उठवत आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे आणि आवाज दडपला जात आहे.”

१ ऑगस्टपासून राष्ट्रवादीचे ‘राज्य वाचवा, संविधान वाचवा’ आंदोलन

शर्मा म्हणाले की “जबरदस्तीने धर्मांतर करणे चुकीचे आहे, परंतु जर कोणी स्वत: च्या इच्छेनुसार धर्मांतर करीत असेल तर त्याला काय हरकत नसावी.” त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव म्हणाले की, “१ ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर ‘राज्य वाचवा, संविधान वाचवा’ आंदोलन सुरू करेल, ज्यामध्ये शेतकरी व युवकांवर लक्ष केंद्रीत केल्या जाईल.”