scorecardresearch

अदाणी प्रकरणावरून संसदेत गदारोळ; दोन्ही सभागृहांचं काम ठप्प

सभागृहाचे कामकाज सुरू होण्याअगोदर काँग्रेस आणि १५ अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.

Aadani parlament
(फोटो लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज आजही गदारोळामुळे ठप्प झालं. संसदेत अदाणी प्रकरणावरून मोठा गदारोळ सुरू झाला. यानंतर दोन्हीही सभागृहांमधील कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगितकरण्यात आले.

राज्यसभेचे कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे, तर लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

काँग्रेसह विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे आज लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच ते दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. तसेच, राज्यसभेचे कामकाजही दुपारी अडीच वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

सभागृहाचे कामकाज सुरू होण्याअगोदर काँग्रेस आणि १५ अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. ज्यामध्ये अदाणी समूहाविरोधात Hindenburg Research द्वारे अदाणींवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत चर्चा झाली आणि याप्रकरणी चौकशीची मागणीचा मुद्दा दोन्ही सभागृहात उपस्थित करण्यावर जोर देण्यात आला.

राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या संसद भवनातील कक्षात झालेल्या बैठकीत काँग्रेस, द्रमुक, आम आदमी पार्टी, भार राष्ट्र समिती, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जनता दल (यूनाइटेड) आणि अनेक विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अदाणी उद्योग समूहाचा उलट्या दिशेने सुरू असलेला प्रवास अजूनही थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीयेत. Hindenburg Research नं अदाणी उद्योग समूहावर बाजारातील व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवल्यानंतर अदाणी उद्योग समूहाची पत ढासळतानाच दिसत आहे. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदाणी उद्योग समूहाला एकूण ११८ अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. हा आकडा त्यांच्या एकूण संपत्ती मूल्याच्या जवळपास ५० टक्के इतका आहे!

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 13:14 IST