UPSC CSE 2025 results toppers list: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल शुक्रवारी (६ मार्च) जाहीर केला. या निकालात अनुज अग्निहोत्री यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. ‘यूपीएससी’च्या नागरी सेवा परीक्षेतून ही देशातील सर्वोच्च अधिकारी निवडले जातात. याची लेखी परीक्षा ऑगस्ट २०२५ मध्ये घेण्यात आली होती, तर मुलाखती डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडल्या होत्या. या दोन्ही टप्प्यांच्या आधारे आयोगाने एकूण ९५८ उमेदवारांची विविध केंद्रीय सेवांसाठी शिफारस केली आहे. या परीक्षेत टॉप १० रँक मिळवलेल्या उमेदवारांची नावे जाणून घेऊयात.

पहिल्या दहामध्ये तीन मुली

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत पहिल्या दहामध्ये तीन मुलींचा समावेश आहे. राजेश्वरी सुवे एम (AIR 2), झिनिया अरोरा (AIR 6) आणि आस्था जैन (AIR 9) या तीन मुलींनी यंदाच्या यूपीएससी परीक्षेत उच्चांकी गुण प्राप्त करून पहिल्या दहामध्ये येण्याची किमया केली आहे.

यूपीएससीने दिलेल्या माहितीनुसार यंदा एकूण ९५८ उमेदवारांची विविध सेवांसाठी शिफारस करण्यात आली आहे. यात आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि केंद्र सरकारच्या गट अ आणि गट ब सेवांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करतात; मात्र काहीशे उमेदवारांनाच अंतिम यादीत स्थान मिळते. यंदाही हजारो उमेदवारांमधून अवघ्या काही जणांनी अंतिम यश मिळवत प्रशासनात प्रवेश मिळवण्याचा मान मिळवला आहे.

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२५ मध्ये पहिल्या १० उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे

१. अनुज अग्निहोत्री
२. राजेश्वरी सुवे एम
३. आकांश धुल्ल
४. राघव झुनझुनवाला
५. ईशान भटनागर
६. झिनिया अरोरा
७. ए. आर. रजाह मोहैदीन
८. पक्षाल सेक्रेटरी
९. आस्था जैन
१०. उज्ज्वल प्रियंक

प्रवर्गनिहाय निवड झालेले उमेदवार

सामान्य प्रवर्ग: ३१७
आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS): १०४
इतर मागासवर्ग (OBC): ३०६
अनुसूचित जाती (SC): १५८
अनुसूचित जमाती (ST): ७३

upsc result
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेतील पहिले २० उमेदवार

९६८ उमेदवारांची शिफारस

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या नागरी सेवा परीक्षेच्या निकालात ९६८ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या निवड झालेल्या उमेदवारांना केंद्राच्या विविध सेवांसाठी काम करावे लागणार आहे. या परीक्षेतून देशातील सर्वोच्च प्राशासनिक अधिकारी निवडले जातात.