अमेरिकेचा निकटचा शेजारी असलेल्या मॅक्सिकोसह अर्जेटिना आणि लॅटिन अमेरिकेतील अन्य देशांनी टेहळणीप्रकरणी अमेरिकेस जाब विचारला आहे. एडवर्ड स्नोडेन याने उघड केलेल्या कागदपत्रांचा तपशील ब्राझीलमधील ‘ओ ग्लोबो’ या दैनिकाने खुला केला. या वृत्तानंतर, लॅटिन अमेरिकेतील अनेक देश संतप्त झाले आहेत. छुप्या टेहळणीप्रकरणी अमेरिकेने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी मेक्सिकोच्या अध्यक्षांनी केली आहे. मेक्सिकोपाठोपाठ अर्जेटिना, ब्राझील, उरुग्वे आणि व्हेनेझुएला या देशांनीही याप्रकरणी अमेरिकेकडे खुलासा मागितला आहे.