मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या तपासात भारताला सहकार्य करा आणि तुमच्या देशात सुरु असलेल्या दहशतवादी संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवा, असा दम अमेरिकेने पाकिस्तानला दम भरला आहे.
मुंबईवर झालेला २६/११ दहशतवादी हल्ला हा भयावह होता. त्यामुळे या प्रकरणात पीडितांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही वेळोवेळी पाकिस्तान सरकारला भारतीय तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची विनंती करत आलो आहोत. या हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानने भारताला पूर्णपणे सहकार्य करायला हवे. पाकिस्तानच्या भूमीत शिजणाऱया दहशतवादी संघटनांच्या मनसुब्यांना तेथील सरकारने आळा घातलाच पाहिजे, असे अमेरिकेच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे.