Attack On US Base In Syria: इराण-इस्रायल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी संघर्षात उडी घेत अमेरिकेने काल इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर हवाई हल्ले केले होते. यानंतर इराणने अमेरिकेच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले होते. आता सीरियाच्या हसकाह प्रांतातील एका अमेरिकन लष्करी तळावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे.

अमेरिकेने इराणमधील तीन अणु प्रकल्पांना लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यांच्या काही तासांनंतर अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला झाल्याचे वृत्त आले आहे. इराण सरकारशी संलग्न असलेल्या मेहर वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला झाला आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात व्यापक संघर्ष सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे.

हा हल्ला इराण समर्थित प्रॉक्सी मिलिशियाने केल्याचा संशय आहे. इराणने यापूर्वी इशारा दिला होता की, जर अमेरिकेने लष्करी कारवाई तीव्र केली, तर या प्रदेशातील अमेरिकन तळ त्यांच्या हल्ल्यांचे लक्ष्य ठरतील.

इराण अमेरिकेने त्यांच्या अणु प्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यांचा सातत्याने निषेध करत आहे. याचबरोबर, इराणविरुद्ध इस्रायलच्या लष्करी मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल इराणने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘गॅम्ब्लर’ म्हणून उल्लेख केला आहे. तसेच, इराण वारंवार अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची धमकी देत आहे.

जुलै २०२४ च्या काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिसच्या अहवालानुसार, यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स किमान ५१ देशांमध्ये १२८ परदेशी लष्करी तळांचे व्यवस्थापन किंवा संचालन करते.

इस्लामिक स्टेटविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय युतीचा भाग म्हणून सीरियामध्ये अमेरिकेचा लष्करी तळ आहे. सीरियामधील अमेरिकेच्या लष्करी उपस्थितीत अल-तन्फ तळ आणि ईशान्य सीरियातील विविध सुविधांचा समावेश आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने सीरियातील अमेरिकन लष्करी उपस्थिती निम्म्याने कमी करण्याची योजना जाहीर केली होती, असे एएफपीने वृत्त दिले आहे.

एजन्स फ्रान्स-प्रेसच्या वृत्तानुसार अमेरिकेचे इराणचा शेजारी देश इराकमधील काही ठिकाणी अल-असद आणि एर्बिल हवाई तळ आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०११ मध्ये इराकवरील अमेरिकेचे सैन्या औपचारिकपणे इराकमधून बाहेर पडल्यानंतर, अमेरिकन सैन्य उत्तर आणि पश्चिमेकडील इराकी भूभागावर ताबा मिळवणाऱ्या इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांशी लढण्यासाठी परतले आहे, असे द न्यू यॉर्क टाईम्सने वृत्त दिले आहे.