scorecardresearch

Premium

अमेरिकेचे आरोप ही ‘चिंतेची बाब’! हत्येच्या कथित कटावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

एका शीख फुटीरतावाद्याची न्यूयॉर्कमध्ये हत्या करण्याचा कट रचल्यावरून अमेरिकेने भारतीय सरकारी अधिकाऱ्याकडे बोट दाखवल्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

US blames Indian government official for plotting to kill Sikh separatist in New York
अमेरिकेचे आरोप ही ‘चिंतेची बाब’! हत्येच्या कथित कटावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया |

पीटीआय, नवी दिल्ली

एका शीख फुटीरतावाद्याची न्यूयॉर्कमध्ये हत्या करण्याचा कट रचल्यावरून अमेरिकेने भारतीय सरकारी अधिकाऱ्याकडे बोट दाखवल्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने केलेला आरोप ही ‘चिंतेची बाब’ असल्याचे मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी गुरूवारी म्हटले आहे. अशा प्रकारे हत्या घडविणे हे सरकारचे धोरण नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

Anger among ST employees
भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युईटीचा भरणा न केल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये रोष
indian navy officers qatar
कतारने ज्या भारतीयांना सुनावली होती फाशीची शिक्षा, त्यांचीच केली सुटका; नेमकं प्रकरण काय?
An international arbitrator in Singapore dismissed a petition challenging the implementation of the merger
सिंगापूरमधील लवादाचा सोनी समूहाला दणका; विलीनीकरणाच्या अंमलबजावणीस विरोध करणारी याचिका फेटाळली
Satyendra Siwal Pakistan’s intelligence agency ISI
भारतीय दूतावासातील कर्मचारी सत्येंद्र सिवल हनी ट्रॅपच्या जाळ्यात; पाकिस्तानला पुरविली गुप्त माहिती

अमेरिका व कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व असल्याचे सांगणारा शीख फुटीरतावादी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येच्या फसलेल्या कटासंदर्भात अमेरिकेतील न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. निखिल गुप्ता नामक व्यक्तीवर कटाचा आरोप ठेवण्यात आला असून एका भारतीय सरकारी अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून त्याने हा कट रचल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. याबाबत गुरूवारी बागची यांना विचारले असता आरोपांचा तपास करण्यासाठी भारताने एक तपास पथक स्थापन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘एका भारतीय व्यक्तीवरील आरोप व त्याचा भारतीय अधिकाऱ्याशी संबंध जोडला जाणे ही चिंतेची बाब आहे. मात्र हे सरकारच्या धोरणाविरुद्ध असल्याचे आम्ही पूर्वीही सांगितले असून मी त्याचा पुनरुच्चार करू इच्छितो’, असे बागची पत्रकार परिषदेत म्हणाले.  संघटित गुन्हे, मानवी तस्करी, शस्त्रांची चोरटी आयात आणि अतिरेकी यांच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील परस्पर संबंध हा यंत्रणांसाठी कायम विचारात घेण्याचा गंभीर मुद्दा राहिल्याचे त्यांनी नमूद केले. अमेरिकेने या संबंधात काही माहिती सोपवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Us blames indian government official for plotting to kill sikh separatist in new york amy

First published on: 01-12-2023 at 03:21 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×