अमेरिकेची भारताला ५० कोटी अमेरिकी डॉलरची मदत

अमेरिकेची भारताला ५० कोटी अमेरिकी डॉलरची मदत

अमेरिकेने भारताला आतापर्यंत ५० कोटी अमेरिकी डॉलरहून अधिक किमतीची करोनासंबंधीची मदत केली असल्याचे व्हाइट हाऊसने बुधवारी सांगितले. इतर देशांना ८ कोटी लशी पुरवण्याबाबत आपण लवकरच निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

‘अमेरिकेचे संघराज्य सरकार व राज्य सरकारे, अमेरिकी कंपन्या, संस्था व नागरिक यांच्याकडून मिळालेल्या योगदानापोटी अमेरिकेने भारताला आतापर्यंत ५० कोटी अमेरिकी डॉलरहून अधिक किमतीची कोविडविषयक मदत केली आहे’, असे व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन प्साकी यांनी आभासी पत्रकार परिषदेत सांगितले.

बायडेन प्रशासन आता करोना महासाथीमुळे प्रभावित झालेल्या दक्षिण आशियातील इतर देशांना मदत पुरवण्याच्या दृष्टीने काम करत आहे. आरोग्यविषयक मदतसामुग्री, प्राणवायू, एन-९५ मुखपट्ट्या, जलद नैदानिक चाचण्यांच्या किट्स आणि औषधे सात विमानांतून आतापर्यंत रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती प्साकी यांनी दिली

अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या ६ कोटी आणि इतर तीन मान्यताप्राप्त लशींच्या २ कोटी अशा करोना प्रतिबंधक लशींच्या ८ कोटी मात्रा पुरवण्याबाबत सध्या आम्ही मध्यस्थता प्रक्रियेच्या माध्यमातून काम करत आहोत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Us dollar aid help india 50 crores akp

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या