scorecardresearch

“चीनने भारतावर आक्रमण केल्यास रशिया…”; अमेरिकेने भारताला स्पष्टच सांगितलं

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकने रशियावर निर्बंध लादलेले असतानाच भारताने रशियाकडून स्वस्तात तेल घेण्याचा निर्णय घेतलाय.

USA Russia
अमेरिकेने भारताला थेट इशारा दिलाय (फाइल फोटो, सौजन्य रॉयटर्स)

अमेरिकेने रशियाच्यासंदर्भाने भारताबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. भारताने रशियासोबत व्यापार करु नये यासाठी अमेरिकेकडून बरेच प्रयत्न केले जात होते. त्यामुळे अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार दलीप सिंह यांनी भारताला इशारा देताना चीन आणि रशियाच्या मैत्रीपासून सावध राहण्यास सांगितलंय. चीनने एलओसीचं उल्लंघन केलं तर रशिया भारताच्या बाजूने उभा राहील असा विचार करु नये असं दलीप सिंह यांनी म्हटलं आहे.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: “तिला हाकलून द्या”; पुतिन यांच्या Girlfriend विरोधात ५९ हजार अर्ज; हिटलरच्या पत्नीशी झाली तुलना

रशिया आणि चीनमधील मैत्रीचं नातं हे फार घट्ट असून हे दोन्ही देश मित्रराष्ट्र आहेत असं दलीप यांनी म्हटलंय. दलीप सिंह यांनी इशारा दिलाय की जर चीनने भारतावर हल्ला केला तर भारताने या भ्रमामध्ये राहू नये की त्यांचा जुना मित्र असणारा रशिया हा भारताच्या बाजूने उभा राहील. कारण सध्या चीन आणि रशिया हे अधिक जवळ आलेत, असं दलीप सिंह यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलंय.

अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार काही दिवसांमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी केलेलं हे वक्तव्य फार महत्वाचं मानलं जात आहे. यापूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी त्यांची भेट घेतली आहे. या मुलाखतीनंतरच दलीप सिंह यांनी भारताने रशिया-चीन यांच्या मैत्रीची दखळ घेणं गरजेचं असल्याचं म्हटलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: “रशियन सैनिक युक्रेनच्या महिलांवर बलात्कार करत आहेत, एका महिलेच्या मुलांसमोरच…”

अमेरिकन उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंह यांनी भारताने रशियाकडून तेल किंवा इतर गोष्टींसंदर्भात व्यवहार करताना घाई करु नये असं आमचं मत असल्याचं स्पष्ट केलंय. दलीप सिंह यांनी रशियासोबतचा व्यापार हा आंतरराष्ट्रीय निर्बंधांमध्ये येतो. रशियाने युक्रेनवर गरज नसताना हल्ला केल्याने अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादलेत. सध्या भारत रशियासोबत करत असणारा व्यापार हा या निर्बंधांचं उल्लंघन करणारा असल्याचं दलीप सिंह यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: “पुतिन यांच्याशी चर्चा केल्यानंतर रशियन संरक्षण मंत्र्यांना आला हार्ट अटॅक, सध्या ते…”

भारताचे परराष्ट्र सचीव हर्षवर्धन श्रृंगला यांनी वॉशिंग्टनमध्ये दलीप सिंह यांची भेट गेतली. दलीप सिंह हे जी-२० देशांच्या समुहासाठीही महत्वाची भूमिका बजावतात. दोन्ही अधिकाऱ्यांमधील चर्चेदरम्यान आर्थिक तसेच धोरणात्मक आघाड्यांवर सहकार्याबद्दल चर्चा झाली. एकमेकांचं हीत जपण्यासाठी जी २० सहीत जागतिक मुद्द्यावर एकत्र काम करण्यासंदर्भात दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. जी २० चं २०२३ मधील संमेलन हे भारतात आयोजित केलं जाणार आहे.

नक्की वाचा >> पुतिन यांच्या जीवाला निकटवर्तीयांपासूनच धोका?; एक हजार शेफ, लॉण्ड्री बॉय आणि बॉडीगार्ड…

दलीप सिंह यांनी भारताला इशारा देताना, “जर चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं तर रशियाकडून आपल्याला देशाच्या सुरक्षेसाठी मदत होईल अशी अपेक्षा भारताने ठेऊ नये. कारण रशिया आणि चीन यांचे संबंध आता घनिष्ठ झाले आहेत,” असं म्हटलंय. दलीप सिंह यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना हे वक्तव्य केलंय. दलीप सिंह यांनी आंतरराष्ट्रीय निर्बंधांकडे कानाडोळा करुन रशियाकडून स्वस्तामध्ये वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असणाऱ्या देशांनाही इशारा दिला.

नक्की पाहा >> Photos: युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन तोफा, गाड्यांवर Z, O, X, V अक्षरं का लिहिली आहेत? त्यांचा अर्थ काय?

मात्र त्याचवेळी दलीप सिंह यांनी भारतासारख्या मित्रराष्ट्रांसोबत अमेरिका कोणत्याही प्रकारच्या निर्बंध धोरणांचं समर्थन करत नाही, असंही स्पष्ट केलं. म्हणजेच रशियासोबत सुरु असणाऱ्या भारताच्या व्यापारामुळे अमेरिका आणि भारताच्या संबंधांवर परिणाम होऊ नये अशीच अमेरिकेची भूमिका असल्याचं ते म्हणालेत. याच कारणामुळे दिल्लीतील अधिकाऱ्यांसोबत दलीप सिंह यांनी जागतिक शांतता आणि सुरक्षेसंदर्भातील विषयांवर चर्चा केल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

नक्की वाचा >> Ukraine War: “एका व्यक्तीच्या इगोमुळं संपूर्ण जगाला त्रास सहन करावा लागतोय, लोकशाही टिकवणं हे…”

दलीप सिंह यांना जेव्हा विचारम्यात आलं की रशियाने भारताला स्वस्तात तेल देण्याची जी ऑफर दिलीय त्याबद्दल तुमचं मत काय आहे. त्यावर त्यांनी, “भारताने रशियाकडून कोणत्याही अशा गोष्टींची खरेदी करु नये ज्या जागतिक निर्बंधांच्या कक्षेमध्ये येतात. अशा वस्तूंचा व्यापार वाढल्याचं दसता कामा नये, असं मला वाटतं,” असं उत्तर दलीप सिंह यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Us dy nsa daleep singh says dont expect russia to help you if china attack scsg

ताज्या बातम्या