ट्रम्प यांची सध्याची भूमिका आणि मतमोजणीचा कल पाहून बायडेन यांच्या विजयानंतरही ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस सोडण्यास नकार दिला तर काय होणार?, या प्रश्नासंदर्भात आता जगभरातील राजकीय वर्तुळांमध्ये चर्चा होऊ लागली आहे. एखादा तत्कालीन राष्ट्राध्क्षाने दुसऱ्यांना निवडणूक लढवली आणि त्यामध्ये त्याचा पराभव झाल्यानंतर त्याने व्हाइट हाऊस सोडण्यास नकार दिला तर नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आणि सीक्रेट सर्व्हिसची भूमिका महत्वाची ठरते. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी व्हाइट हाऊस सोडण्यास नकार दिल्यास नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष सीक्रेट सर्व्हिसला या व्यक्तींना बाहेर काढण्यासंदर्भातील निर्देश देण्याचे अधिकार असतात.
नक्की पाहा >> पगार, भत्ते, घर, गाड्या, विमान अन्… अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मिळणाऱ्या सुविधा पाहून चक्रावून जाल
राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक हारल्यानंतरही आपले पद तसेच सरकारी निवासस्थान असणारे व्हाइट हाऊस सोडण्यास एकाद्या व्यक्तीने नकार दिल्यास काय करावे याबद्दल अमेरिकेच्या संविधानामध्ये काहीच उल्लेख नाहीय. इंडिपेंडेंट या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार पराभव झाल्यानंतरही पदावरुन हटण्यास एखादी व्यक्ती तयार नसल्यास तिला त्या पदावरुन कसे पायउतार करावे याबद्दल अमेरिकेच्या संविधानामध्ये कोणताही उल्लेख नाहीय.
ट्रम्प यांची सध्याची भूमिका पाहून बायडेन यांनी आतापासूनच आपल्या वकीलांचा आणि संविधानातील कायदेपंडितांशी सल्लामसलत सुरु केली आहे. ज्यापद्धतीने ट्रम्प यांनी मतमोजणीच्या पहिल्याच दिवशी थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याबद्दल भाष्य केलं आहे त्यावरुन अडचण निर्माण होण्याची शंका बायडेन यांनाही आहे. ट्रम्प यांनी ईमेलच्या माध्मयातून मतदानामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. पत्रांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मतदानाबद्दल ट्रम्प यांनी शंका उपस्थित केली आहे.