US Presidential Election Results 2024 Updates, 05 November 2024: अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता मतमोजणीतून निकाल समोर येऊ लागले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट लढत पहायला मिळत आहे. आधी जो बायडेन यांच्याशी ट्रम्प यांचा थेट सामना होणार होता. पण ऐनवेळी बायडेन यांच्या माघारीमुळे कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यात आली. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस व डोनाल्ड ट्रम्प या दोघांनाही अध्यक्षीय निवडणुकीसाठीच्या जनमत चाचणीमध्ये जवळपास समसमान विजयाची संधी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे आधी मतदान व त्यानंतरचे निकाल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Live Updates

कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकन जनतेचा काय आहे कौल? जागतिक महासत्तेची सूत्रं कुणाच्या हाती?

17:30 (IST) 6 Nov 2024
US Election 2024 Live Updates in Marathi: ट्रम्प यांच्या विधानावर रशियाची खोचक टिप्पणी!

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी आपण युद्ध घडवणारे नसून युद्ध संपवणारे असल्याचं भाष्य केलं. त्यावरून आता रशियानं खोचक टिप्पणी केली आहे. "डोनाल्ड ट्रम्प आज जे काही म्हणाले ते खरंच प्रत्यक्षात घडेल का, हे तर येत्या काळात कळेलच", अशी प्रतिक्रिया रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी दिली आहे.

16:53 (IST) 6 Nov 2024

US Election Results 2024 Live Updates: डोनाल्ड ट्रम्प २७९ तर कमला हॅरिस २२३

अलास्का व विसकॉन्सिनमधील विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपल्बिकन पक्षाकडे २७९ मतं झाली असून डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्या पाठिशी २२३ मतं झाली आहेत. अमेरिकन सिनेटची एकूण सदस्यसंख्या ५३८ असून विजयासाठी कोणत्याही उमेदवाराला २७० मतांची आवश्यकता असते. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

16:31 (IST) 6 Nov 2024

US Presidential Election Results 2024 Live Updates: डोनाल्ड ट्रम्प यांचं पहिलंच भाषण!

Donald Trump Won US Election 2024: अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या पहिल्याच भाषणात दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं आहे.

वाचा सविस्तर

15:50 (IST) 6 Nov 2024

US Presidential Election Results 2024 Live Updates: अध्यक्षपद निवडणुकीची सद्यस्थिती काय?

आत्तापर्यंतच्या मतमोजणीच्या जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांना ४७.३ टक्के मतांसह २१९ मतं मिळाली आहेत, तर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना ५१.१ टक्के मतांसह २६६ मतं मिळाली आहेत. अध्यक्षपदी निवड होण्यासाठी २७० मतांची आवश्यकता असून डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा आकडा गाठणं आता फक्त औपचारिकताच राहिल्याचं मानलं जात आहे.

14:01 (IST) 6 Nov 2024
US Election Results 2024 Updates : अमेरिकेच्या निवडणुकीत सहा भारतीयांची बाजी; मराठमोळा आमदारही दुसऱ्यांदा विजयी!

एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुमी सुरू असताना जगभरात अमेरिकेच्या निवडणुकीची चर्चा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय निश्चित झाला असून अमेरिकेने सहा भारतीयांनाही स्टेट रिप्रेझेन्टेटिव्ह म्हणून संधी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे यात मराठमोळ्या श्री ठाणेदार यांचाही समावेश आहे. ते सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. याआधी अमेरिकेत पाच भारतीय नेते निवडून आले होते. आता ही संख्या सहावर गेली आहे.

सविस्तर वृत्त वाचा

13:56 (IST) 6 Nov 2024
US Presidential Election Results 2024 Live Updates: "नवा तारा, एलॉन मस्क!"

विजयी भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांचा 'नवा तारा' असा उल्लेख करत त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांचे आभार मानले. फ्लोरिडात झालेल्या वेस्ट पाम बीच परिसरात ट्रम्प यांनी केलेल्या भाषणात त्यांनी एलॉन मस्क यांचा उल्लेख केला. "आपल्याकडे एलॉन मस्क यांच्या रुपात एक नवा तारा आहे. ते अत्यंत हुशार आहेत. आपल्या अशा हुशार लोकांचं आपण जतन केलं पाहिजे. असे खूप कमी लोक आहेत", असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

13:06 (IST) 6 Nov 2024

US Presidential Election Results 2024 Live Updates: डोनाल्ड ट्रम्प यांना बहुमत

माझ्या प्रत्येक श्वासात अमेरिका आहे. मी अमेरिकावासीयांचे आभार मानतो. हा विजय अमेरिकावासीयांचा आहे - डोनाल्ड ट्रम्प

https://twitter.com/ANI/status/1854031159627583993

12:02 (IST) 6 Nov 2024
United States Presidential Elections 2024 Vote Counting Live Updates : २४६ जागांवर ट्रम्प आघाडीवर

२४६ जागांवर ट्रम्प आघाडीवर आहेत, तर १८२ जागांवर कमला हॅरिस आघाडीवर आहेत. ट्रम्प विजयाच्या (२७०) जवळ जात असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

11:39 (IST) 6 Nov 2024
United States Presidential Elections 2024 Vote Counting Live Updates :जॉर्जियात डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय

नॉर्थ कॅरोलिनापाठोपाठ डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्जियात विजय मिळवला आहे.

11:01 (IST) 6 Nov 2024
United States Presidential Elections 2024 Vote Counting Live Updates :

कमला हॅरिस वॉशिंग्टन, हवाई, वर्जिनियामध्ये आघाडीवरून असून ट्रम्प यांना मागे टाकून विजयी होऊ शकतात.

10:35 (IST) 6 Nov 2024
United States Presidential Elections 2024 Vote Counting Live Updates : नॉर्थ कॅरोलिनामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय

डोनाल्ड ट्रम्प यांनी नॉर्थ कॅरोलिनामध्ये विजय मिळवला आहे. असोशिएटेडे प्रेनने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

10:26 (IST) 6 Nov 2024
United States Presidential Elections 2024 Vote Counting Live Updates : सुरुवातीच्या मतमोजणीत ट्रम्प आघाडीवर

रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प सुरुवातीच्या मतमोजणीत डेमोक्रॅटिकच्या उमेदवार कमला हॅरीस यांच्या पुढे आहेत. ट्रम्प २१४ जागांवर तर हॅरिस १७९ जागांवर आघाडीवर आहेत.

10:06 (IST) 6 Nov 2024
United States Presidential Elections 2024 Vote Counting Live Updates : डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियामधून कमला हॅरिस विजयी

अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया राज्यात विजय मिळवला आहे.

09:29 (IST) 6 Nov 2024
United States Presidential Elections 2024 Vote Counting Live Updates:मिसिसिपी, ओहायोमध्ये ट्रम्प यांचा विजय

रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी मिसिसीपी व ओहायो ही राज्ये जिंकली असल्याचं वृत्त सीएनएने प्रसिद्ध केलं आहे.

09:22 (IST) 6 Nov 2024
United States Presidential Elections 2024 Vote Counting Live Updates: 'अमेरिकेतील लोकशाही धोक्यात', ७० टक्के मतदारांचे मत; एक्झिट पोलमधून काय कळते?

एडिसन रिसर्चने गोळा केलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील मतदारांसमोर लोकशाही आणि अर्थव्यवस्था हे सर्वात चिंतेचे विषय आहेत. तर गर्भपात आणि इमिग्रेशन हे त्यापाठोपाठ येणारे मुद्दे आहेत. एडिसनच्या एग्झिट पोलनुसार ७३ टक्के लोकांना लोकशाही धोक्यात असल्याचे वाटते. तर फक्त २५ टक्के लोकांना लोकशाही सुरक्षित असल्याचे वाटते, अशी बातमी रॉयटर्सने दिली आहे. सविस्तर वृत्त वाचा

09:06 (IST) 6 Nov 2024
United States Presidential Elections 2024 Vote Counting Live Updates: डोनाल्ड ट्रम्प १९८ मतांसह आघाडीवर!

डोनाल्ड ट्रम्प यांनी १९८ मतांची आघाडी घेतली असून विजयाच्या दिशेनं त्यांची आगेकूच सुरू झाली आहे. कमला हॅरीस यांना आत्तापर्यंतच्या मतमोजणीत अवघी १०९ मतं मिळाली आहेत. जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना व पेनसिल्वानियामधील ४१ मतं ठरणार गेमचेंजर!

08:50 (IST) 6 Nov 2024

US Election Results 2024 Live Updates: कमला हॅरीस यांना महिला मतदारांची ५४ टक्के मतं!

Women voters:

Harris: 54%

Trump: 44%

White voters:

Trump: 55%

Harris: 43%

Black voters:

Harris: 86%

Trump: 12%

Hispanic voters:

Trump: 45%

Harris: 53%

White men voters:

Trump: 59%

Harris: 38%

White women voters:

Harris: 46%

Trump: 52%

Black men voters:

Harris: 78%

Trump: 20%

Black women voters:

Harris: 92%

Trump: 7%

Hispanic men voters:

Trump: 54%

Harris: 45%

Hispanic women voters:

Trump: 37%

Harris: 61%

Age 18-29:

Trump: 42%

Harris: 55%

Age less than 45:

Harris: 52%

Trump: 44%

Age 65+:

Harris: 50%

Trump: 49%

Age 45+:

Trump: 51%

Harris: 47%

08:49 (IST) 6 Nov 2024
US Election Results 2024 Live Updates: भारतीय वंशाचेराजा कृष्णमूर्ती विजयीे

डेमोक्रॅटिक पक्षाचे भारतीय वंशाचे उमेदवार राजा कृष्णमूर्ती इलिनॉईजमध्ये विजयी

08:23 (IST) 6 Nov 2024

US Election Results 2024 Live Updates: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे १६२ मतं!

रॉयटर्सनं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे १६२ मतांची आघाडी दिसून येत असून कमला हॅरीस ८१ मतांसह पिछाडीवर दिसत आहेत.

https://twitter.com/Reuters/status/1853917167542206931

08:00 (IST) 6 Nov 2024

United States Presidential Elections 2024 Vote Counting Live Updates: अभिनेत्री सेलेना गोमेझचं अमेरिकेतील नागरिकांना आवाहन!

सुप्रसिद्ध अभिनेत्री व गायिका सेलेना गोमेझ हिनं सेल्फी व्हिडीओद्वारे अमेरिकेतील मतदारांना आवाहन केलं आहे. ज्या भागात अद्याप मतदान संपलेलं नाही, अशा ठिकाणी मतदारांनी रांगांमध्ये राहून आपला अधिकार बजावावा, असं सेलेना या व्हिडीओमध्ये म्हणाली आहे. या रांगा खूप मोठ्या असून तिथे उभं राहणं मनस्ताप देणारं आहे हे मला माहिती आहे. पण आपल्या देशासाठी तुमच्या मताची गरज आहे, त्यामुळे रांगेत थांबा, असं आवाहन सेलेना गोमेझनं केलं आहे.

https://twitter.com/APEntertainment/status/1853972157702770997

07:48 (IST) 6 Nov 2024

US Election Results 2024 Live Updates: डेलवेरमध्ये घडला इतिहास!

यूएस रिपब्लिकनच्या लिसा ब्लंट रोचस्टर यांनी एरिक हन्सेन यांचा डेलवेरमध्ये पराभव केला आहे. ब्लंट रोचस्टर हा डेलवेरचं सिनेटमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या महिला व पहिल्या कृष्णवर्णीय व्यक्ती ठरल्या आहेत!

https://twitter.com/AP/status/1853972632581837286

07:43 (IST) 6 Nov 2024

US Election Results 2024 Live Updates: जॉर्जियात घमासान, ट्रम्प व हॅरीस यांच्यात काँटे की टक्कर!

अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालांच्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाच्या जॉर्जिया राज्यात डोनाल्ड ट्रम्प व कमला हॅरीस यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांच्याकडे आत्तापर्यंतच्या मतमोजणीत ५२.७ टक्के मतं असून कमला हॅरीस यांना ४६.७ टक्के मतं मिळाली आहेत.

07:41 (IST) 6 Nov 2024

US Election Results 2024 Live Updates: नॉर्थ हॅम्पशायरमध्ये कमला हॅरीस विजयाच्या उंबरठ्यावर!

एकीकडे डोनाल्ड ट्रम्प दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये विजय मिळवत असताना कमला हॅरीस यांना उत्तरेकडची राज्ये साथ देताना दिसत आहेत. नॉर्थ हॅम्पशायरमध्ये कमला हॅरीस यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

07:29 (IST) 6 Nov 2024

North Carolina Result: नॉर्थ कॅरोलिनामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे जोश स्टेन विजयी!

नॉर्थ कॅरोलिनामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे जोश स्टेन यांनी रिपब्लिकन पक्षाच्या मार्क रॉबिन्सन यांचा पराभव करत गव्हर्नरपद आपल्या नावावर केलं आहे. त्यामुळे कमला हॅरीस यांच्या मतांमध्ये वाढ झाली आहे.

https://twitter.com/AP/status/1853979202065666428

07:14 (IST) 6 Nov 2024

US Election Results 2024 Live Updates: ट्रम्प यांनी ओक्लाहोम, अॅलाबामाही जिंकलं

डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरीस यांच्याविरोधात मोठी आघाडी घेतली असून आत्तापर्यंत त्यांच्या पारड्यात १०५ मतं आली आहेत. ओक्लाहोम व अॅलाबामामध्ये ट्रम्प यांचा विजय निश्चित झाला आहे.

https://twitter.com/Reuters/status/1853917167542206931

07:11 (IST) 6 Nov 2024

US Election Results 2024 Live Updates: डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडातून विजयी

फ्लोरीडा राज्यातून डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला असून इथून त्यांना ३० मतं मिळाली आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयासाठी उमेदवाराला २७० मतांची आवश्यकता आहे.

https://twitter.com/Reuters/status/1853968056390652074

07:10 (IST) 6 Nov 2024

US Election Results 2024 Live Updates: जॉर्जिया डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने!

डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्जिया या महत्त्वाच्या राज्यात आघाडी घेतली आहे. २०२० मध्ये या राज्यात डेमोक्रॅटिक पक्षानं विजय मिळवला होता. दुसरीकडे नॉर्थ कॅरोलिना व पेनसिल्व्हानियामध्ये कमला हॅरीस आघाडीवर आहेत. २०२०मध्ये या दोन राज्यांमध्ये अनुक्रमे रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक पक्षांनी विजय मिळवला होता.

07:07 (IST) 6 Nov 2024

United States Presidential Elections 2024 Vote Counting Live Updates: ट्रम्प यांनी केंटकी आणि इंडियाना सहज खिशात घातलं!

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील केंटकी आणि इंडियाना या दोन राज्यांमध्ये सहज विजय मिळवला असून दुसरीकडे कमला हॅरीस यांनी व्हरमाँटवर वर्चस्व सिद्ध केलं आहे.

https://twitter.com/Reuters/status/1853958669257297959

07:04 (IST) 6 Nov 2024

United States Presidential Elections 2024 Vote Counting Live Updates: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे ९९ मतांची आघाडी

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आत्तापर्यंतच्या मतमोजणीमध्ये ९९ मतांची आघाडी असल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे. त्यामुले कमला हॅरीस यांच्यासमोर डोनाल्ड ट्रम्प यांचं पारडं जड दिसू लागलं आहे.

https://twitter.com/Reuters/status/1853917167542206931

06:50 (IST) 6 Nov 2024
US Presidential Election Results 2024 Live Updates: कॅपिटल बिल्डिंगभोवती कडक सुरक्षाव्यवस्था...

अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील कॅपिटल बिल्डिंगभोवती सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.

https://twitter.com/ANI/status/1853927006234365963

Kamala Harris vs Trump Presidential Debate

कमला हॅरिस व डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ९० मिनिटे विविध मुद्द्यांवर शाब्दिक युद्ध झालं. (AP Photo)

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपद निवडणूक मतदानासंबंधीचे सर्व अपडेट एका क्लिकवर!

Story img Loader