Iran Israel War Live Updates Today : इराण विरोधात इस्रायल आणि अमेरिका यांनी संयुक्त मोहीम राबवत तिथल्या अनेक मुख्य ठिकाणांवर हल्ले केले. तेहरानमध्ये झालेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अताउल्ला खामेनी यांचाही मृत्यू झाला. ज्यानंतर इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आता या घटनेचे परिणाम पाहण्यास मिळत आहेत. या संघर्षाचा आता पुढचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंना फोन केला आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत चर्चा केली. तर खामेनी यांच्या मृत्यूचे पडसाद भारतात आणि पाकिस्तानातही उमटले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून लक्ष्य पूर्ण होईपर्यंत इराणवर हल्ले सुरुच राहणार असल्याची घोषणा केली आहे. ज्या शक्तींनी मानवी सभ्यतेच्या विरोधात युद्ध पुकारलं आहे त्यांना अमेरिका शिक्षा करणारच. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स आणि सैन्य दलांना थेट इशारा दिला आहे की त्यांनी हल्ले थांबवले नाहीत तर आणखी मृत्यूंची तयारी ठेवा. या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Live Updates

US Israel Attack Iran News Live Today, 2 March 2026 "आमचं लक्ष्य पूर्ण होईपर्यंत अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरुच राहणार"; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

08:11 (IST) 3 Mar 2026

US-Iran Conflict : रियाधमधील अमेरिकन दूतावासावर इराणचा ड्रोन हल्ला; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "प्रत्युत्तर काय असेल हे…"

सौदी अरेबियामधील रियाध येथील अमेरिकन दूतावासावर ड्रोनने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ...सविस्तर बातमी
21:25 (IST) 2 Mar 2026

नागरी उड्डाण मंत्रालयाकडून महत्त्वाची माहिती

"पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष असून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आज नियोजित असलेली ३५७ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत," अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली आहे.

मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, "पॅसेंजर असिस्टन्स कंट्रोल रूमच्या (PACR) माध्यमातून आम्ही प्रवाशांच्या तक्रारींचे सतत संनियंत्रण करत आहोत. आतापर्यंत एअरसेवा (AirSewa), सोशल मीडिया आणि हेल्पलाईनच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या ५५९ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. विमान कंपन्या आणि संबंधित घटकांशी समन्वय साधून प्रवाशांना तातडीने मदत दिली जात आहे."

प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना: विमान उड्डाणे रद्द होणे किंवा त्यांच्या वेळेत बदल होण्याबाबत अधिकृत माहितीसाठी प्रवाशांनी संबंधित विमान कंपनीच्या अधिकृत माध्यमांचा वापर करावा. मदतीसाठी मंत्रालयाच्या PACR हेल्पलाईन क्रमांकावर ०११-२४६०४२८३ / ०११-२४६३२९८७ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://twitter.com/ANI/status/2028496855336694053

21:20 (IST) 2 Mar 2026
इस्रायल-इराणच्या हल्ल्यात ओमानमध्ये एका भारतीयाचा मृत्यू

"MKD Vyom जहाजावरील एका भारतीय नागरिकाच्या दुर्दैवी निधनाबद्दल ओमानमधील भारतीय दूतावास खोल दुःख व्यक्त करत असून मृताच्या नातेवाईकांचे सांत्वन करत आहे. जहाजावरील इतर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना लवकरात लवकर मायदेशी परत आणण्यासाठी दूतावास ओमानमधील स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात आहे...", अशी ओमानमधील भारतीय दूतावासांनी एक्स पोस्ट केली आहे.

https://twitter.com/ANI/status/2028476948046061758

21:19 (IST) 2 Mar 2026

Ayatollah Khamenei Family Killed : अयातुल्ला खामेनी यांच्या पत्नीचाही मृत्यू; इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची शक्यता!

Ayatollah Khamenei's wife Killed : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात खामेनी यांचे संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...वाचा सविस्तर
20:09 (IST) 2 Mar 2026

Operation Epic Fury : "युद्धाची सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू", इराणला इशारा देत अमेरिकेने सांगितली हल्ल्यामागची उद्दिष्ट्ये

US Secretary of War Pete Hegseth warns Ira : इराण-अमेरिका युद्धाने भीषण वळण घेतले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी स्पष्ट केले की, 'ऑपरेशन एपिक फ्युरी' अंतर्गत इराणचे अण्वस्त्र प्रकल्प आणि नौदल पूर्णपणे नष्ट केले जाईल. ...सविस्तर बातमी
19:20 (IST) 2 Mar 2026

Live : पंतप्रधान मोदींनी साधला आखाती देशांच्या प्रमुखांशी संपर्क; हल्ल्यांचा तीव्र निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दोन अत्यंत महत्त्वाच्या टेलिफोनिक चर्चा केल्या. त्यांनी बहरीनचे राजे हमाद बिन ईसा अल खलिफा आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स व पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान अल सौद यांच्याशी संवाद साधला.

या दोन्ही देशांवर झालेल्या अलीकडील हल्ल्यांचा पंतप्रधानांनी तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच, या दोन्ही देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेबद्दल त्यांनी सविस्तर चर्चा केली. पश्चिम आशियातील वाढता तणाव पाहता भारताने या मित्रराष्ट्रांच्या सार्वभौमत्वाला पाठिंबा दर्शवला आहे.

https://twitter.com/ANI/status/2028450710396801431

19:03 (IST) 2 Mar 2026

Israel-Iran War Update : इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयावर हल्ला, इराणचा दावा; सरकारी आणि लष्करी कार्यालयही लक्ष्य!

IRGC claims targeting Benjamin Netanyahu's office : इराण आणि इस्रायलमधील युद्ध आता टोकाला पोहोचले असून, इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. ...वाचा सविस्तर
18:23 (IST) 2 Mar 2026

US Jets Downed in Kuwait : कुवेतच्या हवाई दलाकडून फ्रेंडली फायर! अमेरिकेची तीन लढाऊ विमाने चुकून पाडली

Kuwaiti air defenses shoot down 3 US F-15 fighter jets : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध भीषण वळणावर असतानाच एक खळबळजनक घटना घडली आहे. कुवेतच्या हवाई संरक्षण यंत्रणेने चुकून अमेरिकेचीच ३ शक्तिशाली 'F-15' फायटर जेट्स पाडली आहेत. ...सविस्तर वाचा
16:00 (IST) 2 Mar 2026

Iran-US War China Reaction Update : "आता संघर्ष थांबवा!'; इराण-अमेरिका युद्धावर चीनची पहिली प्रतिक्रिया!

China breaks silence on Iran-US war, urges immediate ceasefire : इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धावर चीनने अखेर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम आशियातील हा संघर्ष अधिक भडकू नये आणि युद्धाची व्याप्ती वाढू नये, यासाठी चीनने दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. ...वाचा सविस्तर
15:57 (IST) 2 Mar 2026

PM Modi : "पश्चिम आशियातील परिस्थिती आमच्यासाठी गंभीर चिंता," पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे वक्तव्य

पश्चिम आशियामतील स्थितीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे. ...सविस्तर बातमी
15:24 (IST) 2 Mar 2026

सोन्या-चांदीच्या दरांत मोठी उसळी; अमेरिका–इस्रायल कारवाईनंतर गुंतवणूक सुरक्षित पर्यायांकडे, ४ टक्क्यांची वाढ

Gold and Silver Prices March 2, 2026: सोन्या चांदीच्या बाजारात आज मोठी घडामोड झाली आहे. जर आज तुम्ही सोने-चांदीच्या खरेदी किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आजच्या किंमतीवर एकदा नजर टाका. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे (मध्य पूर्वेतील युद्ध) संपूर्ण जगाच्या बाजारपेठा हादरल्या आहेत. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपासून ते भारतीय सराफा बाजारांपर्यंत सोन्या -चांदीच्या किमती वाढल्या आहेत. सविस्तर वाचा

14:52 (IST) 2 Mar 2026

सौदी अरेबियातील अरामको या सर्वात मोठ्या रिफायनरीवर इराणचा ड्रोन हल्ला

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाचे पडसाद थेट सौदी अरेबियातली अरामको रिफायनरीपर्यंत पोहचले आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार सौदी अरेबियातील सरकारी तेल कंपनी असलेल्या अरामकोवर ड्रोन हल्ला केला. यामुळे या कंपनीला आग लागली आहे. तसंच ड्रोन हल्ले झाल्यानंतर ही रिफायनरी बंद करण्यात आली आहे. अल जझिराने यासंदर्भातला व्हिडीओ पोस्ट केला आहे.

13:48 (IST) 2 Mar 2026
इराण इस्रायल संघर्षामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त कारवाई केली आणि हल्ले केले. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा रविवारी मृ्त्यू झाला. दरम्यान आशिया खंडात या युद्धाचा परिणाम पाहण्यास मिळाला. सोमवारी सकाळी शेअर बाजार उघडताच १ हजार अंशांनी तो कोसळला. तर दुसरीकडे जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती ९ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

13:45 (IST) 2 Mar 2026

अमेरिकेचं F 15 हे विमान पाडण्यात आलं?

इराणच्या सरकारी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार कुवेतमध्ये अमेरिकेचं एक विमान F 15 पाडण्यात आलं आहे. या वृत्ताबाबत अमेरिकेने किंवा कुवेतच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही.

13:39 (IST) 2 Mar 2026

हिजबुल्लाहचा उत्तर इस्रायलवर हल्ला; ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’अंतर्गत दुहेरी आघाडीवर लढाई

शनिवारी (२८ फेब्रुवारी) सुरू झालेल्या इस्रायल आणि इराणमधील युद्धाने मोठे स्वरूप धारण केले आहे. या युद्धात अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे इराणवर हल्ला चढवला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलसह आखाती देशांतील अमेरिकेच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. त्यामध्ये यूएई, बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना इराणने लक्ष्य केले आहे

सविस्तर बातमी वाचा

12:46 (IST) 2 Mar 2026

इराण-इस्रायल संघर्षादरम्यान पंतप्रधान मोदींचा नेतान्याहूंना फोन; नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत झाली चर्चा

इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांशी संवाद साधला….

12:43 (IST) 2 Mar 2026

खामेनींच्या मृत्यूनंतर अमेरिकेचा इराणी नौदलावर जबरदस्त प्रहार; ९ युद्धनौका बुडवल्याचा ट्रम्प यांचा दावा

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इस्त्रायल आणि अमेरिका अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. तेहराणमधील महत्त्वाची कार्यालये आणि संवेदनशील ठिकाणांवर इस्त्रायल व अमेरिकेने लक्ष्य केले आहे. तसेच अमेरिकेने इराणच्या नौदलावरही निशाणा साधल्याचा दावा केला आहे. या कारवाईत सुमारे ९ जहाजे बुडाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. उर्वरित जहाजांचाही शोध सुरू असून तीही नष्ट करण्यात येतील, असे त्यांनी म्हटले आहे

12:38 (IST) 2 Mar 2026

अमेरिकेने युद्धात उतरवली सर्वात मोठी युद्धनौका, इराणवर हल्ले सुरुच राहणार; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

पूर्व भूमध्य समुद्रात अमेरिकेने ताकदवान तैनाती केली आहे. इराणवर समुद्र आणि हवाई हल्ल्यांचा मारा सुरूच आहे.

बातमी सविस्तर वाचा

Donald Trump

डोनाल्ड ट्रम्प AP Photo/Allison Robbert)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून लक्ष्य पूर्ण होईपर्यंत इराणवर हल्ले सुरुच राहणार असल्याची घोषणा केली आहे. ज्या शक्तींनी मानवी सभ्यतेच्या विरोधात युद्ध पुकारलं आहे त्यांना अमेरिका शिक्षा करणारच. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स आणि सैन्य दलांना थेट इशारा दिला आहे की त्यांनी हल्ले थांबवले नाहीत तर आणखी मृत्यूंची तयारी ठेवा.