US Iran War Live Updates : इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्त कारवाई करत जे हल्ले केले त्यात अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. यानंतर आता या तिन्ही देशांमधला संघर्ष वाढला आहे. इराणने आता सौदी अरेबियातील अमेरिकेच्या दुतावासावर ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. सौदीत जगातली सर्वात मोठी रिफायनरी असलेली अरामको कंपनी आहे. या कंपनीवरही इराणने ड्रोन हल्ला केला होता. या घटनेनंतर कंपनीला आग लागली होती. जी नियंत्रणात आणण्यात आली. अमेरिकेने आम्ही ४० दिवस तरी हल्ले करत राहू असा इशारा इराणला दिला होता. तसंच सैन्य दलांच्या कारवाया आणि हल्ले बंद करा असंही इराणला सांगण्यात आलं होतं. मात्र इराणने उत्तरादाखल सुरु केलेले हल्ले थांबलेले नाहीत. आता या युद्धाचे आणखी काय परिणाम बघायला मिळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे इस्रायल आणि इराण युद्धाचे चटके संपूर्ण जगाला बसत आहेत. कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशालाही नुकसान सोसावं लागणार हेच संकेत आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यात २८ फेब्रुवारीपासून हल्ले-प्रतिहल्ले सुरु झाले आहेत. यानंतर आता या युद्धाची झळ भारताला बसताना दिसून येते आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम झाला तर देशांतर्गत इंधनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हे युद्ध जर दीर्घकाळ सुरू राहिलं तर घरगुती वापराचा एलपीजी गॅस महागणार असून पेट्रोलच्या दरातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या आणि अशा सगळ्या अपडेट्स जाणून घेऊ लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

Live Updates

US Israel Attack Iran News Live Today, 3 March 2026 इराणने सौदीतील अमेरिकेच्या दुतावासावर केला ड्रोन हल्ला, वाचा महत्त्वाचे अपडेट्स

16:22 (IST) 3 Mar 2026

Iran Israel War Gulf Countries Impact : इराणचं अमेरिका आणि इस्रायविरोधात युद्ध, मग आखाती देशांवर हल्ले का?

Iran Israel War impact and why Gulf countries are under threat explained : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध पेटलेले असताना इराणचे लक्ष्य केवळ इस्रायल नसून आखाती देशही का आहेत, याचा सविस्तर आढावा. ...अधिक वाचा
16:11 (IST) 3 Mar 2026

How Khamenei Was Killed: ट्रॅफिक कॅमेरे, मोबाईल टॉवर्सच्या मदतीनं अमेरिका - इस्त्रायलने खामेनींची हत्या कशी केली?

Ayatollah Khamenei Killed: गेल्या अनेक वर्षांपासून इस्त्रायलने तेहरानमधील ट्रफिक कॅमेरे हॅक केले होते. मोबाईल टॉवर्सच्या सिग्नलामध्ये देखील अडथळा निर्माण केला होता. ...अधिक वाचा
16:11 (IST) 3 Mar 2026

Earthquake In Iran: अमेरिका-इस्त्रायलबरोबर संघर्ष सुरु असतानाच इराणवर नैसर्गिक संकट, जाणवले भूकंपाचे धक्के

Iran Earthquake: ऐन युद्धात इराणमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ...सविस्तर बातमी
14:32 (IST) 3 Mar 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग्य भूमिका घेतली पाहिजे, राहुल गांधींची मागणी

अमेरिका आणि इस्रायल आणि इराणच्या वाढत्या संघर्षात भारतीय लोकही अडकले आहेत आणि ते अनिश्चिततेचा सामना करत आहेत. भारताने याबाबत योग्य ती भूमिका घेतली पाहिजे. एक कोटी भारतीयांचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानवी जीवन याबाबत आपल्या देशाने ठोस भूमिका घेतली पाहिजे. असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींनी या घटनेबाबत भूमिका घेतली पाहिजे असं म्हटलं आहे.

14:09 (IST) 3 Mar 2026

इराणचे १३ सैनिक युद्धात ठार

इराणने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत त्यांचे १३ सैनिक युद्धात ठार झाले आहेत. इस्रायलच्या सैन्याने इराणच्या राजधानीला लक्ष्य केलं आहे. दरम्यान तीन अमेरिकन सैनिकांचाही या युद्धात मृत्यू झाला आहे.

10:40 (IST) 3 Mar 2026

खामेनींच्या मृत्यूनंतर पंतप्रधान मोदींनी मौन का बाळगलंय? सोनिया गांधींचा सवाल

इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अताउल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. ज्यानंतर आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. खामेनी यांच्या मृत्यूबाबत केंद्र सरकारने मौन का बाळगलं आहे? असा सवाल सोनिया गांधींनी या पत्रातून केला आहे.

10:35 (IST) 3 Mar 2026

तुम्ही ओबामा आणि बायडेन यांना खुशाल दोष देऊ शकता- डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स वर लिहिलं आहे की, "जर मी ओबामांनी केलेला इराण अण्वस्त्र करार (JCPOA) रद्द केला नसता, तर तीन वर्षांपूर्वी इराणकडे अण्वस्त्रे असती. हा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक करार होता आणि जर तो तसाच राहिला असता, तर आज जग पूर्णपणे वेगळे असते. यासाठी तुम्ही बराक हुसेन ओबामा आणि जो बायडेन यांना खुशाल दोष देऊ शकता."

09:38 (IST) 3 Mar 2026

इराण-इस्रायल संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किंमती सलग तिसऱ्या दिवशी वाढल्या

इराण इस्रायल संघर्षमुळे कच्च्या तेलाच्या किंमती सलग तिसऱ्या दिवशी वाढल्या आहेत. ज्याचा परिणाम जगावर होणार आहे यात काहीही शंका नाही. कच्च्या तेलाचे दर हे मंगळवारी १.४ टक्क्यांनी वाढले आहेत. मागच्या तीन दिवसांत कच्च्या तेलांच्या दरामध्ये ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. येत्या काळात कच्चं तेल आणखी महागण्याची चिन्हं आहेत त्यामुळे त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होईल यात शंकाच नाही.

09:38 (IST) 3 Mar 2026

US-Iran Conflict : अमेरिकेबरोबरच्या संघर्षादरम्यान इराणने बंद केली होर्मुझ सामुद्रधुनी; जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांना दिला गंभीर इशारा

US-Iran Conflict : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...सविस्तर वाचा
09:38 (IST) 3 Mar 2026

इराण-इस्रायल संघर्षाचा भडका; अमेरिकन नागरिकांना १२ पेक्षा अधिक देशांतून बाहेर पडण्याचे आदेश

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर प्रदेशात तणाव प्रचंड वाढला आहे. इराणनेही इस्रायल आणि अमेरिकेवर प्रतिहल्ला केला आहे. आखाती देशांतील बहुतांश विमानतळे सध्या बंद असून समुद्री वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे.

वाचा सविस्तर ...

09:31 (IST) 3 Mar 2026

आम्हाला इराणसह संघर्ष वर्षानुवर्षे चालवायचा नाही-जे.डी. व्हान्स

अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी फॉक्स न्यूजला मुलाखत दिली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की अमेरिका अशा संघर्षात मुळीच पडणार नाही जे वर्षानुवर्षे सुरु राहिल. आम्हाला हा संघर्ष वर्षानुवर्षे मुळीच चालवायचा नाही.

09:28 (IST) 3 Mar 2026

इराणकडून ओमानच्या समुद्रात असलेल्या जहाजावर हल्ला

इराण आणि अमेरिकेतील युद्ध पेटले आहे. इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ला करत आहेत. इराण देखील थांबण्याचे नाव घेत नाही. इराणकडून मोठी हल्ले केली जात आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला, अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा मागील एक महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून आयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर लक्ष ठेऊन होती. इराण अमेरिका, इस्त्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धात इराणकडून ओमानच्या समुद्रामध्ये असलेल्या जहाजांवर हल्ला केला जात आहे. मोठी क्षेपणास्त्र थेट जहाजांवर टाकली जात आहेत. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, इराणकडून एका जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला. त्यामध्ये तीन भारतीयांचा मृत्यू झाला. २० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी आहेत.

08:36 (IST) 3 Mar 2026

आखाती देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार-देवेंद्र फडणवीस

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय कार्यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. केंद्र सरकार सुद्धा सर्वतोपरी मदत महाराष्ट्र सरकारला करीत आहे. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲप क्रमांक जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या व्हॉटसॲप क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. व्हॉटसॲप क्रमांक : +97150 365 4357

08:34 (IST) 3 Mar 2026
US-Iran Conflict : रियाधमधील अमेरिकन दूतावासावर इराणचा ड्रोन हल्ला; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "प्रत्युत्तर काय असेल हे…"

अमेरिका-इराण संघर्ष पेटलेला असताना सौदी अरेबियामधील रियाध येथे असलेल्या अमेरिकन दूतावासावर ड्रोनने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ...वाचा सविस्तर

08:28 (IST) 3 Mar 2026

इराणला चोख उत्तर दिलं जाईल-डोनाल्ड ट्रम्प

इराणने सौदीतल्या अमेरिकन दुतावासावर हल्ला केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरु झालेलं युद्ध एक महिन्याहून अधिक काळ चालू शकतं. आमचा सर्वात मोठा हल्ला अद्याप बाकी आहे. अमेरिका दीर्घकाळ युद्धासाठी तयार आहे. आम्ही युद्ध सुरु केलं तेव्हा चार आठवड्यांचा कालावधी निश्चित केला होता. आता मात्र युद्ध दीर्घकाळ सुरु राहू शकतं अशी स्थिती आहे. इराणला चोख उत्तर दिलं जाईल असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

Middle-East-war-tensions-1

इस्रायल आणि इराण युद्धाचे चटके संपूर्ण जगाला बसत आहेत. कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशालाही नुकसान सोसावं लागणार हेच संकेत आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यात २८ फेब्रुवारीपासून हल्ले-प्रतिहल्ले सुरु झाले आहेत. यानंतर आता या युद्धाची झळ भारताला बसताना दिसून येते आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम झाला तर देशांतर्गत इंधनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हे युद्ध जर दीर्घकाळ सुरू राहिलं तर घरगुती वापराचा एलपीजी गॅस महागणार असून पेट्रोलच्या दरातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.