US-Iran War : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर मध्यपूर्वेतील संघर्ष अधिकच चिघळताना दिसत आहे. यादरम्यान इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी शुक्रवारी या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांबाबत माहिती दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पेझेश्कियान यांनी एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी काही देशांकडून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात मध्यस्थीचे प्रयत्न केले जात असल्याचे म्हटले आहे.
मध्यस्थीबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करताना इराणचे अध्यक्ष म्हणाले की, आम्ही पश्चिम आशियामध्ये शांतता राखण्यासाठी वचनबद्ध आहोत, परंतु मध्यस्थीचे प्रयत्न हे त्यांच्या मते जे कोणी चिथावणीसाठी जबाबदार आहेत त्यांच्यावर केंद्रित असायला हवेत.
“काही देशांनी मध्यस्थीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना आमचे उत्तर स्पष्ट आहे: आम्ही प्रदेशात दीर्घकाळ शांतता राखण्यासाठी वचनबद्ध आहोत, परंतु आमच्या देशाची प्रतिष्ठा आणि अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही जराही संकोच करणार नाही,” असे पेझेश्कियान यांनी सांगितले.
“मध्यस्थीचे प्रयत्न आशांबरोबर झाले पाहिजेत, ज्यांनी इराणच्या लोकांना कमी लेखून चिथावणीची आग पेटवली आहे,” असेही त्यांनी पुढे नमूद केले.
इराणचा क्युबाला इशारा
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध सुरू असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठं वक्तव्य करत क्यूबा देशाला धमकी दिली आहे. ‘आम्हाला आधी हे युद्ध (इराणशी) संपवायचं आहे, मग त्यानंतर जास्त वेळ लागणार नाही, जेव्हा अमेरिकेचं लक्ष क्यूबाच्या दिशेने असेल’, असा सूचक इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी क्यूबाला दिला आहे. व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरच्या युद्धाचा संदर्भ म्हटलं की, “आम्हाला हे युद्ध आधी संपवायचं आहे. मात्र, त्यानंतर अमेरिकेचं लक्ष क्युबाकडे वळण्यास फार वेळ लागणार नाही”, असा सूचक इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच ट्रम्प यांनी असंही म्हटलं की, क्युबा अमेरिकेशी करार करू इच्छित आहे आणि भविष्यात तेथे राहणारे बरेच लोक त्यांच्या देशात परत येऊ शकतात.
