Natanz nuclear facility US-Israel strike latest news : मध्य पूर्वेतील तणाव दिवसेंदिवस वाढत जात असून आता इराणच्या नतांज परमाणु केंद्रावर भीषण हल्ला करण्यात आला आहे. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे ही कारवाई केली असून यामुळे जगभर खळबळ माजली आहे.
किरणोत्सर्गाचा धोका टळला
इराणच्या तस्निम या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात नतांज संवर्धन केंद्राला निशाणा बनवलं आहे. हमल्याची तीव्रता इतकी भीषण होती की या हल्ल्याचा आवाज सर्वदूर पसरला होता. प्राथमिक तपासानंतर इराणी अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. कारण आतापर्यंत कोणत्याही किरणोत्सर्गी पदार्थांची गळती झालेली नाही. याचा अर्थ अणू कचरा गळतीची सर्वांत मोठी भीती सध्यातरी नाही.
निवासी रहिवासी सुरक्षित
इराणी प्रसारमाध्यमांचा दावा आहे की स्फोट होऊनही जवळच्या निवासी भागांतील रहिवासी सुरक्षित आहेत. सरकारने या लष्करी कारवाईचे वर्णन रणाचा अणुकार्यक्रम रोखण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या अमेरिका इस्रायल मोहिमेचा एक भाग असे केले आहे.
खरंतर नतांज अणूऊर्जा केंद्र हे शत्रूंचे नेहमीच लक्ष्य राहिले आहे. २०२५ पासून या स्थळाला अनेकवेळा लक्ष्य करण्यात आले आहे. प्रत्येकवेळी पायाभूत सुविधा आणि यंत्रसामग्रीचे नुकसान झाले आहे. परंतु, सुदैवाने पर्यावरणाची कोणतीही मोठी हानी झालेली नाही.
इराणच्या विमानतळावरही हल्ला
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इराणच्या लष्कराने शनिवारी इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर विमानांना इंधन पुरवणाऱ्या टाक्यांवर ड्रोनद्वारे हल्ला केल्याचे सांगितले, असे देशाच्या सरकारी माध्यमांनी वृत्त दिले आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धसमाप्तीचे संकेत दिलेले असताना इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी मात्र युद्धविराम होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. जपानच्या क्योडो न्यूजला दिलेल्या मुलाखतीत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायलसोबतचे युद्ध संपवण्यासाठी तेहरानला केवळ युद्धविरामापेक्षा अधिक काहीतरी लागेल. आमचा संदेश हा आहे की हे युद्ध आमचे नाही. ते आमच्यावर लादले गेले आहे. आम्ही अमेरिकेशी वाटाघाटी करत असतानाच त्यांनी आमच्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. हे आक्रमणाचे एक उघड कृत्य होते. बेकायदेशीर, अन्यायकारक आणि विनाकारण केलेले,” असे अराघची म्हणाले. त्यांनी पुनरुच्चार केला, “आमची भूमिका ही आहे की आम्ही युद्धविराम स्वीकारत नाही कारण गेल्या वर्षीची परिस्थिती पुन्हा निर्माण व्हावी असे आम्हाला वाटत नाही.
