वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सर्वोच्च आरोग्य संस्थेने (सीडीसी – यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंशन) भारतात प्रवास करणाऱ्या अमेरिकन नागरिकांसाठी ‘स्तर- १’ करोना सूचना जारी केली आहे. यात नमूद केले आहे की  पूर्णपणे लसीकरण झाले असेल तर  संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. भारतातील करोना परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सीडीसी’ने सोमवारी ही नवीन प्रवास  सूचना जारी केली असून ती  सुरक्षित मानली जाते. पाकिस्तानसाठीही प्रवास आरोग्य सूचना जारी करण्यात आली आहे.  भारतात जाण्यापूर्वी तुम्ही पूर्णपणे लसीकरण केले असल्याची खात्री करा. तेथील शिफारशी किंवा नियमांचे पालन करावे, असे  या सूचनेमध्ये म्हटले आहे. या वर्षांच्या सुरुवातीला, अमेरिकेने भारताला स्तर- ४ मध्ये ठेवले होते आणि अमेरिकेतील नागरिकांना भारतात प्रवास करू नये, असे सांगितले होते.