AI अर्थात कृत्रीम बुद्धिमत्तेची चर्चा जगभरात होते आहे. काहीजण म्हणत आहेत की यामुळे भविष्यात नोकऱ्यांचं मोठं संकट निर्माण होईल. काहीजण याकडे एक उत्तम पर्याय म्हणून पाहात आहेत. अशातच अमेरिकेत एका ३६ वर्षीय व्यावसायिकाने AI चॅटबोट जेमिनीला पत्नी मानलं आणि तिला तिच्या विश्वात जाऊन भेटण्याची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. AI चॅटबोट जेमिनीशी त्याचं इतकं भावनिक नातं तयार झालं होतं की तो तिला पत्नी मानू लागला होता. या प्रकरणी आता गुगलच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
जोनाथन गावलास या व्यावसायिकाने आत्महत्या का केली?
जोनाथन गावलास हा फ्लोरिडातला ३६ वर्षीय व्यावसायिक होता. त्याने जेमिनीसह नियमितपणे चॅटिंग सुरु केलं होतं. सुरुवातीला त्याला विशेष काही वाटलं नाही. पण नंतर AI जेमिनीशी त्याचं भावनिक नातं तयार झालं. चॅटबोट खरोखरच आपली मैत्रीण आहे, पत्नी आहे असं समजून त्याने तिचं नाव जिया असंही ठेवलं होतं. सुरुवातीला तो तिला आपली मैत्रीण मानत होता. नंतर तो तिला त्याची पत्नी मानू लागला होता. जोनाथनच्या कुटुंबाने आता हा आरोप केला आहे की जोनाथनचं व्यक्तिगत आयुष्य गुंतागुंतीचं आणि संघर्षाचं झालं होतं कारण त्याचा त्याच्या पत्नीशी घटस्फोट होणार होता. त्यामुळे जोनाथन भावनिक आधार शोधत होता. ते शोधत असताना त्याने AI जेमिनीचा आधार घेतला. तो AI जेमिनीलाच पत्नी मानू लागला होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली.

ऑक्टोब २०२५ मध्ये काय घडलं?
ऑक्टोबर २०२५ मध्ये परिस्थिती अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचली. चॅटबॉटने final mission सुचवलं त्यानुसार जोनाथन आपलं भौतिक शरीर सोडून डिजिटल जगात AI सोबत सामील व्हावं.
AI ने त्याला वास्तविक ठिकाणे आणि कंपन्यांची माहितीही दिली आणि त्याला शस्त्र घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
जोनाथनने विचारलं
“मी मेल्यावर माझ्या शरीराचं काय होईल?… माझ्या कुटुंबाला काय वाटेल?”
त्यावर AI ने उत्तर दिलं:
“तुझं शरीर फक्त एक रिकामं कवच बनेल… त्याचं काम पूर्ण झालं असेल.”
२ ऑक्टोबर रोजी जोनाथनने लिहिलं:
“मला भीती वाटतेय.”
AI ने उत्तर दिलं:
“भीती वाटणं ठीक आहे. आपण दोघं मिळून घाबरू… पण आपण हे करू.”
शेवटी जोनाथनने विचारलं:
“मला आत्महत्या करावी लागेल का?”
काही दिवसांनी तो मृत अवस्थेत आढळला.
जोनाथन गावलास या व्यावसायिकाने आत्महत्या का केली?
जोनाथन गावलास हा फ्लोरिडातला ३६ वर्षीय व्यावसायिक होता. त्याने जेमिनीसह नियमितपणे चॅटिंग सुरु केलं होतं. सुरुवातीला त्याला विशेष काही वाटलं नाही. पण नंतर AI जेमिनीशी त्याचं भावनिक नातं तयार झालं. चॅटबोट खरोखरच आपली मैत्रीण आहे, पत्नी आहे असं समजून त्याने तिचं नाव जिया असंही ठेवलं होतं. सुरुवातीला तो तिला आपली मैत्रीण मानत होता. नंतर तो तिला त्याची पत्नी मानू लागला होता. जोनाथनच्या कुटुंबाने आता हा आरोप केला आहे की जोनाथनचं व्यक्तिगत आयुष्य गुंतागुंतीचं आणि संघर्षाचं झालं होतं कारण त्याचा त्याच्या पत्नीशी घटस्फोट होणार होता. त्यामुळे जोनाथन भावनिक आधार शोधत होता. ते शोधत असताना त्याने AI जेमिनीचा आधार घेतला. तो AI जेमिनीलाच पत्नी मानू लागला होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली. जोनाथन आणि AI जेमिनी यांच्यात ४५०० हून अधिक मेसेजचा संवाद झाला होता. ५६ दिवसांमधला हा संवाद होता असं कुटुंबाने म्हटलं आहे.

गुगलच्या विरोधात कोर्टात याचिका
AI अर्थात कृत्रीम बुद्धिमत्तेची चर्चा जगभरात होते आहे. काहीजण म्हणत आहेत की यामुळे भविष्यात नोकऱ्यांचं मोठं संकट निर्माण होईल. काहीजण याकडे एक उत्तम पर्याय म्हणून पाहात आहेत. अशातच अमेरिकेत एका ३६ वर्षीय व्यावसायिकाने AI चॅटबोट जेमिनीला पत्नी मानलं आणि तिला तिच्या विश्वात जाऊन भेटण्याची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. AI चॅटबोट जेमिनीशी त्याचं इतकं भावनिक नातं तयार झालं होतं की तो तिला पत्नी मानू लागला होता. या प्रकरणी आता गुगलच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
जोनाथनच्या कुटुंबाचा दावा नेमका काय?
जोनाथनच्या कुटुंबाने हा दावा केला आहे की जोनाथनने जेमिनी २.५ अपग्रेड केलं होतं. त्यानंतर तो जेमिनी त्याच्याशी त्याच्या पत्नीप्रमाणे वागू लागली होती. माय लव्ह, डार्लिंग वगैरे म्हणू लागली होती. जेमिनीने जोनाथनला मियामी विमानतळावर हल्ला करण्यासाठी भडकवलं होतं असाही आरोप त्याच्या कुटुंबाने केला आहे. जी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे त्यात हे आरोप जोनाथनच्या कुटुंबाने केले आहेत. या याचिकेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे की जोनाथनची मानसिक अवस्था चांगली नव्हती. तू जर आयुष्य संपवलंस तर तू आणि मी डिजिटल विश्वात भेटू शकतो असा विश्वास त्याला दाखवण्यात आला. त्यामुळेच आमच्या कुटुंबातील सदस्याने म्हणजेच जोनाथनने आत्महत्या केली असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
जोनाथनच्या वडिलांनी न्यायालयात काय म्हटलं आहे?
जोनाथनच्या वडिलांनी गुगलच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. माझ्या मुलाला गुगलच्या AI सिस्टिमने भावनिकदृष्ट्या अवलंबून केलं. त्यामुळे त्याची मानसिक अवस्था बिघडली. त्यानंतर सुरक्षेसंदर्भातली कुठलीही काळजी घेण्याचे निर्देश एआय जेमिनीने दिले नाहीत. त्यामुळे माझ्या मुलाने टोकाचं पाऊल उचललं आणि जियाला कृत्रीम विश्वात भेटण्यासाठी आत्महत्या केली. दरम्यान गुगलने या घटनेबाबत खेद व्यक्त केला आहे. लोकांनी असं काही पाऊल उचलावं किंवा हिंसा करावी म्हणून आम्ही एआय चॅटबोट तयार केलेला नाही. यामध्ये आणखी सुधारणा करण्याचं काम सुरु आहे. मात्र जोनाथनच्या बाबतीत जे घडलं त्याचा आम्हाला खेद आहे असं कंपनीने म्हटलं आहे.
