U.S. Midterm Elections Republicans vs Democrats Highlights: अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या उर्वरित कार्यकाळासाठी काँग्रेसची सूत्रे डेमोक्रॅट्सच्या हाती सोपवली आहेत. असोसिएटेड प्रेस (AP) ने दिलेल्या माहितीनुसार, डेमोक्रॅटिक पक्षाने आधी सिनेट आणि त्यानंतर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजवर (प्रतिनिधी गृह) विजय मिळवत कॅपिटल हिलवर पूर्ण नियंत्रण मिळवलं आहे. हा निकाल ट्रम्प प्रशासन आणि वॉशिंग्टनवर सत्ता गाजवणाऱ्या रिपब्लिकन पक्षासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी मध्यावधी निवडणुकीचा निकाल स्वीकारणार असल्याचं सांगत डेमोक्रॅट्ससोबत मिळून काम करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. देशभरात आलेल्या या अनपेक्षित ‘ब्लू वेव्ह’ (निळ्या लाटेत) डेमोक्रॅट्सनी सिनेटमध्ये ५४ जागा आणि हाऊसमध्ये २२५ जागांवर विजय मिळवला आहे.
डेमोक्रॅट्सचा ऐतिहासिक विजय
डेमोक्रॅट्ससाठी मिळालेल्या मोठ्या विजयांमध्ये, जेम्स टॅलारिको हे टेक्सासमध्ये अमेरिकन सिनेटची जागा जिंकणारे पक्षाचे पहिले उमेदवार ठरले आहेत. अॅडम हॅमिल्टन हे १९३२ नंतर कॅन्ससमध्ये अमेरिकन सिनेटची जागा जिंकणारे पहिले डेमोक्रॅट असतील. मेन राज्यावर सलग ३० वर्षे वर्चस्व गाजवणाऱ्या सुझान कॉलिन्स यांचा ट्रॉय जॅक्सन यांनी पराभव केला, तर अब्दुल अल-सईद यांनी मिशिगनमधील अमेरिकन सिनेटच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. डॉ. अब्दुल अल-सईद यांनी मिशिगनमध्ये विजय मिळवून एक नवा इतिहास रचला असून, सिनेटवर निवडून येणारे ते पहिले मुस्लिम व्यक्ती ठरतील. याशिवाय, रामस्वामी यांच्याविरुद्ध झालेल्या चुरशीच्या लढतीनंतर डेमोक्रॅट एमी अॅक्टन यांनी ओहायोच्या गव्हर्नरपदाची निवडणूक जिंकली आहे.
या निवडणुकीत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जच्या (प्रतिनिधी गृह) सर्व ४३५ जागा, सिनेटच्या १०० पैकी ३५ जागा आणि ३६ राज्यांच्या गव्हर्नर (राज्यपाल) पदांसाठी मतदान झाले आहे. मतमोजणी मंगळवारी रात्रीपर्यंत सुरू राहणार असून, काही जागांचे अंतिम निकाल बुधवार किंवा त्यानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सध्या संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व आहे. मात्र ट्रम्प यांच्या धोरणांना लगाम घालण्यासाठी आणि महत्त्वाच्या निर्णयांवर अंकुश ठेवण्यासाठी बहुमताचा आकडा गाठण्याचा डेमोक्रॅटिक पक्षाचा प्रयत्न आहे. २०२७ नंतरची देशाची राजकीय दिशा ठरवण्यात या निवडणुकीचे निकाल निर्णायक ठरणार आहेत.
रिपब्लिकनला डेमोक्रॅटिकचे आव्हान
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये (प्रतिनिधी गृह) डेमोक्रॅटिक पक्षाला विजय मिळाल्यास, हा पक्ष काँग्रेसमधील ट्रम्प यांच्या योजनांना रोखू शकेल आणि त्यांच्या प्रशासनाविरोधात चौकशी सुरू करू शकेल. वाढती महागाई (राहणीमानाचा खर्च) आणि इराणसोबतचे युद्ध यांमुळे मतदारांमध्ये असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर, ही निवडणूक मुख्यत्वे ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाची परीक्षा मानली जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
निवडणुकीच्या निकालानंतर डेमोक्रॅटिक पक्षासोबत सहकार्य करणार का, याबाबत विचारलं असता ट्रम्प यांनी सकारात्मक उत्तर दिलं. “आम्ही डेमोक्रॅट्ससोबत काम करू. त्यांच्यासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. आम्ही बहुधा काहीतरी मार्ग काढू”, असं ट्रम्प यांनी म्हटल्याचं न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात नमूद केलं आहे.
US Senate Election 2026: Vote Counting and Latest Results
US Midterm Election Results Live: रिपब्लिकन पक्षाचा पराभव होताच व्हाईट हाऊसने ट्रम्प यांचा फोटो पोस्ट करत दिला महत्त्वाचा संदेश
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला प्रतिनिधीगृह आणि सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर व्हाईट हाऊसने एक्स हँडलवर ट्रम्प यांचा फोटो पोस्ट करत ट्रम्प अजूनही तुमचे राष्ट्राध्यक्ष आहेत, असा संदेश दिला आहे.
US Midterm Election Results Live: अमेरिकेच्या निकालामुळे वॉशिंग्टनचा इराणकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणार नाही
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले आहे. ट्रम्प यांच्या पक्षाची निकालात पिछेहाट दिसत असली तरी यावरून वॉशिंग्टनचा तेहरानकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणार नाही, असे मोजतबा खामेनी म्हणाले आहेत.
US Midterm Election Results Live: मध्यावधी निवडणुकात कोणते घटक महत्त्वाचे ठरले?
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत महागाई आणि जीवनमानाचा वाढलेला खर्च हे कळीचे मुद्दे ठरले. असोशिएटेड प्रेसने केलेल्या मतदार सर्वेक्षणानुसार, मध्यावधी निवडणुकीत महत्त्वाचे ठरलेले घटक खालीलप्रमाणे...
अर्थव्यवस्था - ३९ टक्के
लोकशाहीची स्थिती - ३२ टक्के
स्थलांतर - १४ टक्के
आरोग्य - ८ टक्के
परराष्ट्र धोरण - ४ टक्के
गुन्हे - ३ टक्के
U.S. Midterm Election Results Live: इराणने उडवली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली
अमेरिकेच्या मध्यावमधी निवडणुकांमध्ये प्रतिनिधीगृह आणि सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने दमदार विजय प्राप्त केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विरोधक आनंदी झाले आहेत. भारतातील इराण दूतावास कार्यालयाने निकालानंतर एका मीमच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे.
अमेरिकेतील अधिकारी डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाईट हाऊसमधून उचलून बाहेरील केराच्या टोपलीत टाकत असल्याचा व्हिडीओ इराणच्या राजदूत कार्यालयाने शेअर केला आहे.
https://twitter.com/Iran_in_India/status/2117852081189216309
"इराणमुळे माझा पराभव झाला", डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली कबुली
मध्यावधी निवडणुकांत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा फटका बसला आहे. इराणविरोधात पुकारलेल्या युद्धामुळे त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली असल्याचं डोनाल्ड ट्र्म्प यांनी मान्य केलंय. इराणमुळे हा पराभव झाला, असं द वॉल स्ट्रीट जर्नलशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
US Midterm Elections 2026 Results Live: डेमोक्रॅट्सचा ऐतिहासिक विजय
डेमोक्रॅट्ससाठी मिळालेल्या मोठ्या विजयांमध्ये, जेम्स टॅलारिको हे टेक्सासमध्ये अमेरिकन सिनेटची जागा जिंकणारे पक्षाचे पहिले उमेदवार ठरले आहेत. अॅडम हॅमिल्टन हे १९३२ नंतर कॅन्ससमध्ये अमेरिकन सिनेटची जागा जिंकणारे पहिले डेमोक्रॅट असतील. मेन राज्यावर सलग ३० वर्षे वर्चस्व गाजवणाऱ्या सुझान कॉलिन्स यांचा ट्रॉय जॅक्सन यांनी पराभव केला, तर अब्दुल अल-सईद यांनी मिशिगनमधील अमेरिकन सिनेटच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. डॉ. अब्दुल अल-सईद यांनी मिशिगनमध्ये विजय मिळवून एक नवा इतिहास रचला असून, सिनेटवर निवडून येणारे ते पहिले मुस्लिम व्यक्ती ठरतील. याशिवाय, रामस्वामी यांच्याविरुद्ध झालेल्या चुरशीच्या लढतीनंतर डेमोक्रॅट एमी अॅक्टन यांनी ओहायोच्या गव्हर्नरपदाची निवडणूक जिंकली आहे.
अमेरिकन जनतेचा युद्धाला ‘नकार’! "इराण संघर्षाचा फटका रिपब्लिकन पक्षाला", ट्रम्प यांची जाहीर कबुली; इराणची प्रतिक्रिया काय?
पृथ्वीपासून ४०० किमी उंचीवरून अंतराळवीर अनिल मेनन यांनी बजावला मतदानाचा हक्क; VIDEO व्हायरल, नेमकं कसं शक्य झालं?
अमेरिकेतील मिशिगन राज्याच्या सिनेट निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार अब्दुल एल-सय्यद यांनी विजय मिळवला आहे. या विजयासह अमेरिकेच्या सिनेटवर निवडून जाणारे ते पहिले मुस्लिम व्यक्ती ठरले आहेत. मंगळवारी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे माजी खासदार माइक रॉजर्स यांचा पराभव केला. अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी वर्तवलेल्या निकालांच्या अंदाजानुसार, डेमोक्रॅटिक पक्षाच्या ताब्यात असलेली ही महत्त्वाची जागा पक्षाने कायम राखली आहे.
अब्दुल एल-सय्यद हे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील माजी अधिकारी आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अंतर्गत उमेदवारी निवडणुकीत अनेक प्रतिस्पर्ध्यांवर मात करून त्यांनी मुख्य निवडणुकीत प्रवेश केला होता.
मिशिगनमधील या जागेचे विद्यमान सिनेटर गॅरी पीटर्स यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत एल-सय्यद यांनी विजय मिळवत अमेरिकेच्या राजकारणात नवा इतिहास घडवला आहे.
"देशाचं नुकसान होण्यापासून रोखा", बराक ओबामांची पोस्ट चर्चेत; मध्यावधी निवडणुकांचे निकाल लागताच ट्रम्पविरोधात आक्रमक भूमिका!
US Midterm Elections 2026 Results Live: "या निवडणुकीच्या निकालामुळे माझ्यावर आघात झालेला नाही", डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
फॉक्स न्यूजला (Fox News) दिलेल्या एका थेट फोन मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, “या निकालाकडे मी माझ्यावर झालेला आघात म्हणून पाहत नाही. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि आम्ही केलेल्या सर्व गोष्टींच्या बाबतीत, अध्यक्षपदाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी दोन वर्षे आमची राहिली आहेत”, असा दावा त्यांनी केला.
Live: "जागतिक वर्चस्वाच्या आश्वासनांआधी लोकांना आर्थिक स्थैर्य, उत्तरदायित्व हवंय", अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीच्या निकालावरून दिपकेंची पोस्ट
२०१० नंतर, जगाने हुकूमशाही प्रवृत्तीच्या राजकारणाचं एक नवं आकर्षण पाहिलं. लोकशाहीमुळे प्रगतीचा वेग मंदावत आहे आणि एकच सामर्थ्यवान नेता त्यांच्या सर्व समस्या सोडवू शकतो, यावर विश्वास ठेवण्यास लोकांना प्रवृत्त केलं गेलं. ज्या नेत्यांनी स्वतःला संस्थांपेक्षा मोठं मानलं आणि राष्ट्रीय गौरव, समृद्धी व जागतिक वर्चस्वाची आश्वासने दिली, त्यांच्यावर लोकांनी आपला विश्वास टाकला. परंतु, यानंतर लोकशाही संस्थांचा ऱ्हास, हक्कांचं दमन, युद्धे आणि आर्थिक गोंधळ उडाला.
नजीकच्या काळातील राजकीय प्रवाह असे दर्शवतात की, हुकूमशाही राजकारणावरील हा विश्वास आता डळमळीत होऊ लागला आहे. लोकांना हे उमजू लागलं आहे की, स्वतःला सामर्थ्यवान म्हणवून घेणाऱ्या एकाच व्यक्तीच्या हातात सत्ता केंद्रित केल्याने राष्ट्र अधिक मजबूत होतंच असं नाही. ते पुन्हा एकदा लोकशाही स्वातंत्र्य, उत्तरदायित्व (जबाबदारी) आणि ज्या संस्थांना त्यांनी एकेकाळी गृहीत धरलं होतं, त्यांचं मूल्य ओळखू लागले आहेत.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, राष्ट्रीय गौरव म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न लोक आता विचारू लागले आहेत. जागतिक वर्चस्वाच्या आश्वासनांआधी लोकांना आर्थिक स्थैर्य, परवडणारी राहणीमान पातळी आणि सत्तेत असलेल्यांकडून उत्तरदायित्व या मूलभूत गोष्टी हव्या आहेत. - अभिजीत दिपके
https://twitter.com/abhijeet_dipke/status/2117858314554089679
'अमेरिका ट्रम्प यांनाच देशाबाहेर पाठवण्याच्या तयारीत'; निवडणुकीतील पिछाडीवरून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या विवेक रामास्वामींना धक्का! ट्रम्प यांच्या 'पोस्टर बॉय'चा पराभव का ठरतोय चर्चेचा विषय?
US Midterm Elections 2026 Results Live: ट्रम्प यांच्याकडून डेमोक्रॅट्सचे अभिनंदन; ‘त्यांनी चांगली कामगिरी केली’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला बसलेल्या मोठ्या पराभवावर प्रतिक्रिया देताना डेमोक्रॅटिक पक्षाचे अभिनंदन केलं आहे. ‘डेमोक्रॅट्सनी चांगली कामगिरी केली’, अशी कबुली ट्रम्प यांनी दिली. या निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांनी फॉक्स न्यूजशी फोनद्वारे संवाद साधला.
फॉक्स न्यूजचे वृत्तनिवेदक ब्रेट बेयर यांच्याशी बोलताना ट्रम्प यांनी निवडणुकीच्या निकालाबाबत आश्चर्य व्यक्त केलं. निवडणुकीपूर्वी वातावरणात काहीतरी वेगळं असल्याची जाणीव होत होती, असंही त्यांनी सांगितलं.
"आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यामुळे या निकालामुळे मला थोडं आश्चर्य वाटलं", असं ट्रम्प म्हणाले.
दरम्यान, पराभवानंतर ट्रम्प यांनी काहीशी नरमाईची भूमिका घेतली. काँग्रेसमध्ये डेमोक्रॅटिक पक्षासोबत काम करण्यासाठी अनेक मुद्दे असल्याचं त्यांनी नमूद केलं. दोन्ही पक्ष एकत्रितपणे अनेक विषयांवर काम करू शकतात, असंही त्यांनी सूचित केलं.
तसंच, मध्यावधी निवडणुकीतील निकालांचा परिणाम म्हणून आपल्या मंत्रिमंडळात कोणतेही बदल करण्याचा विचार नसल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे निवडणुकीतील पराभवानंतरही मंत्रिमंडळात फेरबदल होणार नसल्याचे त्यांनी आपल्या विधानातून स्पष्ट केलं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव स्वीकारला; म्हणाले, "मी डेमोक्रॅट्ससोबत काम करेन"; मध्यावधी निवडणुकीचे कल स्पष्ट!
US Midterm Elections 2026 Results Live: माईक जॉन्सन यांनी निकालांवर 'निराशा' व्यक्त केली; २०२८ मध्ये पुन्हा सभागृह ताब्यात घेण्याचा विडा उचलला
हाऊस स्पीकर माईक जॉन्सन यांनी कबूल केलं की, रिपब्लिकन पक्षासाठी ही रात्र अत्यंत कठीण होती आणि निकालांमुळे ते निराश झाले आहेत. सोबतच, २०२८ मध्ये रिपब्लिकन पक्ष हाऊस (सभागृह) पुन्हा आपल्या ताब्यात घेईल, असा शब्दही त्यांनी दिला.
लुईझियाना येथील श्रीव्हपोर्ट येथे आयोजित निकाल पाहण्याच्या कार्यक्रमात जॉन्सन म्हणाले, "आम्हाला येथे काही खऱ्या आव्हानांचा सामना करावा लागला." जॉन्सन यांनी प्रतिज्ञा केली की, "२०२८ मध्ये आम्ही सभागृह परत जिंकू आणि हे काम पूर्ण करू."
US Midterm Elections 2026 Results Live: मी मतपत्रिकेवर नव्हतो' - ट्रम्प
रिपब्लिकन पक्षाला मध्यावधी निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागत असल्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' प्लॅटफॉर्मवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, “मी मतपत्रिकेवर नव्हतो आणि जर असतो, तर आम्ही प्रचंड बहुमताने विजयी झालो असतो!”
US Midterm Elections 2026 Results Live: ट्रम्प यांच्या पाठिंब्यानंतरही रामास्वामी यांचा पराभव
बायोटेक उद्योजक रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठिंब्यासह राज्यपालपदाची निवडणूक लढवली होती. त्यांच्या या पराभवामुळे रिपब्लिकन पक्षाने ओहायोच्या राज्यपाल कार्यालयावरील आपले नियंत्रण गमावले आहे. टर्म-लिमिटेड (कार्यकाळ संपलेले) रिपब्लिकन राज्यपाल माईक डिवाईन यांच्यानंतर आता अॅक्टन हे पदभार स्वीकारतील.
हाकीम जेफ्रीस यांचा विजय, पहिले कृष्णवर्णीय 'हाऊस स्पीकर' होण्याच्या मार्गावर
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमधील (प्रतिनिधी गृह) अल्पसंख्याक नेते आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार हाकीम जेफ्रीस यांनी न्यूयॉर्कच्या आठव्या मतदारसंघातून आपली जागा जिंकली आहे. त्यांचा हा विजय अपेक्षित असला, तरी तो एका वेगळ्या कारणासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. अपेक्षेप्रमाणे जर डेमोक्रॅटिक पक्षाने कनिष्ठ सभागृहावर (हाऊस) नियंत्रण मिळवले, तर जेफ्रीस हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले कृष्णवर्णीय 'हाऊस स्पीकर' (सभागृह अध्यक्ष) बनतील.

एमएस नाऊ, एनबीसी न्यूज आणि सीएनएन यांनी डेमोक्रॅटिक पक्ष हाऊसवर ताबा मिळवणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
आयडाहो, मोंटाना, नेवाडा आणि युटा या राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण
डेमोक्रॅटिक पक्ष हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमधील (प्रतिनिधी गृह) जागा वेगाने जिंकत आहे. या सभागृहावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला ४३५ पैकी २१८ जागांची आवश्यकता असते. दरम्यान, अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने काहीच तासात चित्र स्पष्ट होणार आहे.
'हाऊस' (प्रतिनिधी गृह) हे अमेरिकन काँग्रेसचे कनिष्ठ सभागृह आहे. येथील सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो आणि नवीन कायदे सिनेटमध्ये जाण्यापूर्वी सहसा याच सभागृहात मांडले जातात व त्यावर चर्चा केली जाते.
गेल्या एका तासात, डेमोक्रॅटिक पक्षाने रिपब्लिकन पक्षाकडून आणखी दोन जागा खेचून आणल्याचे दिसून येत आहे. केंटकीमधून झॅक डेम्बो आणि न्यू जर्सीमधून रेबेका बेनेट हे आपापल्या जागा जिंकतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
US Midterm Elections 2026 Results Live: अमेरिकेच्या इतिहासात पहिल्या कृष्णवर्णीय महिला राज्यपाल, केशा लान्स बॉटम्स यांचा जॉर्जियाच्या राज्यपाल निवडणुकीत विजय
केशा लान्स बॉटम्स यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार रिक जॅक्सन यांचा पराभव करत जॉर्जियाची राज्यपाल निवडणूक जिंकली आहे.
या विजयामुळे अटलांटाच्या माजी महापौर असलेल्या लान्स बॉटम्स यांनी अमेरिकेच्या इतिहासात राज्यपाल म्हणून निवडून येणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरून इतिहास रचला आहे. तसेच, त्या जॉर्जियाच्या पहिल्या महिला राज्यपाल देखील असतील.
ट्रम्प यांचे मतदारांना आवाहन: 'जर तुम्ही रांगेत असाल, तर रांगेतच राहा'
ट्रम्प यांनी रिपब्लिकन्सच्या X खात्यावरून एक छोटा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी मतदान करण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना, अगदी मतदानाची वेळ संपल्यानंतरही रांगेतच राहण्याचं आवाहन केलं आहे.

"नमस्कार रिपब्लिकन्स. आपण खूप चांगली कामगिरी करत आहोत. जर तुम्ही रांगेत असाल, तर रांगेतच राहा", असं ट्रम्प म्हणाले.
राज्यातील मतदानाच्या नियमांनुसार, मतदानाची वेळ संपताना जे मतदार आधीच रांगेत उभे असतात, ते त्यांचे मत टाकू शकतात, फक्त त्यांनी त्यांच्या नंबरची वाट पाहणं आवश्यक आहे.
"आपण खूप मोठ्या फरकाने जिंकणार आहोत", असंही ट्रम्प पुढे म्हणाले.
अमेरिकेच्या राजकीय भविष्याची दिशा ठरवणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या मध्यावधी निवडणुकांची (US Midterm Elections 2026) मतमोजणी सुरू झाली असून, सुरुवातीच्या कलांमध्ये मोठा धक्कादायक बदल पाहायला मिळत आहे. रिपब्लिकन पक्षाचे भक्कम बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या मतदारसंघांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने घेतलेली सुरुवातीची आघाडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या जुलिआना स्ट्रॅटोन या इलिनियॉसमधून युएस सिनेट निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.
डेमोक्रॅटचे दिग्गज नेते मार्क वॉर्नर व्हर्जिनियामधून पुन्हा एकदा सिनेटवर विजयी झाले आहेत.
नॉर्थ कॅरोलिनाचे माजी गव्हर्नर रॉय कूपर यांनी रिपब्लिकन उमेदवाराचा पराभव करून युएस सिनेटची जागा जिंकली आहे आणि हा डेमोक्रॅट्ससाठी मोठा विजय मानला जात आहे.
क्रिस पप्पास हे न्यू हम्फायरमधून युएस सिनेट निवडणुकीत विजयी झाले आहेत. (यापूर्वी ते याच राज्यातील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज - कनिष्ठ सभागृहाचे सदस्य होते).
मॅसॅच्युसेट्समधून एडवर्ड 'एड' मार्की हे ज्येष्ठ डेमोक्रॅटिक सिनेटर पुन्हा एकदा विजयी झाले आहेत.
न्यू जर्सीमधून प्रख्यात डेमोक्रॅटिक सिनेटर कॉरी बुकर हे अपेक्षेप्रमाणे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
डेलावेअर राज्यामधून डेमोक्रॅटिक पक्षाचे ख्रिस कून्स हे देखील आपली सिनेटची जागा राखून विजयी झाले आहेत.
अमेरिकेत मध्यावधी निवडणुकांची मतमोजणी सुरू असतानाच, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी विविध वृत्तवाहिन्यांना आणि माध्यमांना मुलाखती देणं सुरू केलं आहे. डेमोक्रॅटिक पक्षाला काँग्रेसवर (संसद) नियंत्रण मिळण्याची शक्यता असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ट्रम्प यांनी सीबीएस न्यूजला सांगितलं की, त्यांच्याकडे सर्वोच्च शक्ती आहे.
ट्रम्प म्हणाले, "माझ्याकडे सर्वोच्च शक्ती आहे – त्याला 'व्हेटो' (veto - नकाराधिकार) म्हणतात." तसंच, फायनान्शियल टाइम्सशी बोलताना त्यांनी या मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचाच विजय होईल, असा अंदाज वर्तवला.
US Midterm Elections 2026 Results Live: जॉर्जियामधील सिनेटची जागा डेमोक्रॅट्सने राखली, जॉन ऑसॉफ दुसऱ्यांदा विजयी
डेमोक्रॅटिक पक्षाचे जॉर्जियामधील विद्यमान सदस्य जॉन ऑसॉफ (वय ३९) यांनी सलग दुसऱ्यांदा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार माईक कॉलिन्स यांचा पराभव केला. २०२१ साली जॉन ऑसॉफ पहिल्यांदा विजयी झाले होते. यावेळी रिपब्लिकन्सला जॉर्जियातून विजय मिळले, अशी खात्री होती. मात्र तरुण असलेल्या जॉन यांनी ५९ वर्षीय कॉलिन्स यांचा पराभव केला.
US Midterm Elections 2026 Results Live Updates: भारतीय वंशाचे डेमोक्रॅट सुहास सुब्रमण्यम पुन्हा विजयी
भारतीय वंशाचे डेमोक्रॅट सुहास सुब्रमण्यम व्हर्जिनियाच्या १० व्या काँग्रेस मतदारसंघातून अमेरिकी प्रतिनिधीगृहावर पुन्हा निवडून आले आहेत.
US Midterm Elections 2026 Results Live Updates: डोमोक्रॅटची घोडदौड सुरू, जॉर्जियाच्या ६ व्या मतदारसंघातून मिळवला विजय
जॉर्जियाच्या ६ व्या मतदारसंघातून डेमोक्रॅट लुसी मॅकबाथ यांचा पुन्हा एकदा विजय झाला असून त्या अमेरिकी प्रतिनिधीगृहावर पुन्हा निवडून आल्या आहेत.
मंगळवारी झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार ब्रेंट अँडरसन यांचा पराभव करत डेमोक्रॅट डेबी वासरमन शुल्त्झ यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी फ्लोरिडाच्या २० व्या जिल्ह्यातून विजय मिळवत अमेरिकन प्रतिनिधीगृहाची जागा जिंकली.
नॉर्थ कॅरोलिना आणि ओहायो राज्यांवर अमेरिकेची नजर
अमेरिकेतील काही राज्यांमध्ये मतदान केंद्रे नुकतीच बंद व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र अद्यापही काही राज्यात मतदान सुरू आहे. सीबीएस न्यूजने व्हर्जिनियामधील सिनेटच्या शर्यतीत डेमोक्रॅट मार्क वॉर्नर विजयी होतील असा अंदाज वर्तवला आहे.
तर नॉर्थ कॅरोलिना आणि ओहायोमधील मतदान लवकरच संपणार आहे. या दोन राज्यांवर विशेष नजर असणार आहे.
ओहायोमध्ये २०२४ मध्ये ट्रम्प यांना मतदान झाले होते. मात्र आता तिथे रिपब्लिकन उमेदवारांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे. तर नॉर्थ कॅरोलिनामध्येही सिनेटची जागा डेमोक्रॅट्स जिंकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचा भारतावर काय होणार परिणाम? (छायाचित्र एआय जनरेटेड)
