अमेरिकी लष्कराचं हेलिकॉप्टर समुद्रात कोसळलं; शोधमोहिम सुरू

एमएफ-६०एस हेलिकॉप्टर दुपारी ४.३०च्या सुमारास कोसळल्यानंतर शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.

Us navy helicopter crash san diego coast rescue operation underway
सॅन दिएगोच्या किनारपट्टीवर बेपत्ता असलेल्या हेलिकॉप्टरचा शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. (प्रातिनिधीक छायाचित्र : रॉयटर्स)

यूएसएस अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेवरून उड्डाण घेतलेले एक अमेरिकन लष्करी हेलिकॉप्टर बुधवारी सॅन दिएगोजवळ समुद्रात कोसळले, असे अमेरिकी नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे. सॅन दिएगोच्या किनारपट्टीजवळील कोसळलेल्या हेलिकॉप्टरसाठी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे, असे त्यात म्हटले आहे.

अमेरिकेच्या नौदलाचे हेलिकॉप्टर मंगळवारी दक्षिण कॅलिफोर्नियातील समुद्रात विमानवाहू युद्धनौकेवरुन उड्डाण घेतल्यानंतर कोसळले, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. एमएफ-६०एस हेलिकॉप्टर दुपारी ४.३०च्या सुमारास कोसळल्यानंतर शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.

सॅन दिएगोपासून सुमारे ६० नॉटिकल मैल अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळले असल्याचे अमेरिकेच्या नौदलाच्या यूएस पॅसिफिक फ्लीटने ट्विटरवर म्हटले आहे. नौदलाच्या म्हणण्यानुसार विमान नियमित उड्डाण घेत असताना हा अपघात झाला. ते हेलिकॉप्टर यूएसएस अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेवर होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Us navy helicopter crash san diego coast rescue operation underway abn

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या