अमेरिकेत नाईट क्लबमध्ये गोळीबार; १७ जखमी

एकाची प्रकृती गंभीर

प्रतिनिधिक छायाचित्र

अमेरिकेत पुन्हा एका नाईट क्लबमध्ये एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात १७ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी ट्विटरद्वारे दिली आहे. गोळीबारातील जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमेरिकेतील अरकान्सास राज्यातील लिटील रॉक येथील एका नाईट क्लबमध्ये एका कॉन्सर्टदरम्यान वाद झाला. या वादातून एका व्यक्तीने गोळीबार केला. यात १७ जण जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी ही घटना घडली. लिटील रॉक पोलिसांनी या घटनेची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. एकाची प्रकृती गंभीर आहे, असं पोलिसांनी सांगितलं. हा दहशतवादी हल्ला नसावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Us nightclub shooting at least 17 injured