अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख बराक ओबामा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला दिल्लीत उपस्थित राहणार असल्याने भारताकडून अत्यंत कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र, अमेरिकी सुरक्षा यंत्रणाही राष्ट्रप्रमुखांच्या सुरक्षेत कोणतीही उणीव राहणार नाही, याची काळजी घेताना दिसत आहेत. त्यासाठी भारतात फिरताना ओबामा स्वत:ची ‘द बीस्ट’ ही कार वापरणार आहेत. या कारची वैशिष्ट्ये पाहता अमेरिकन सुरक्षा यंत्रणा भारतात ओबामांना हीच कार वापरण्याचा आग्रह का धरत होत्या, याचे कारण स्पष्ट होते. या कारची तुलना चार चाकांचा रणगाडा अशी केल्यास वावगे ठरणार नाही. जनरल मोटर कंपनीकडून तयार करण्यात आलेली १८ फूट आणि फूट १० इंच उंचीची ही कार आठ इंची जाडीच्या आर्मर कवचाने सुसज्ज आहे. याशिवाय, गाडीच्या बुलेटप्रुफ काचांची जाडी पाच इंच इतकी आहे. त्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना केमिकल शस्त्रांच्या हल्ल्यापासून संरक्षण मिळते. गाडीच्या दरवाजांची तुलना करायची झाल्यास त्यांचे वजन बोईंग- ७५७ या विमानाच्या दरवाज्यांइतके आहे.
ही गाडी स्टील, अॅल्युमिनियम,टिटानियम तसेच सिरॅमिकचा वापर करून बनवण्यात आली आहे. या गाडीच्या खाली बॉम्ब ठेवून जरी स्फोट करण्यात आला. तरीदेखील ही गाडी सुरक्षित राहील. कारण पाच मोठ्या स्टील प्लेट गाडीखाली लावण्यात आल्या आहेत. पेट्रोलच्या टाकीला सुध्दा आर्मर प्लेटिंग करण्यात आलं आहे. गाडीवर खास पध्दतीचे फोम लावण्यात आले आहे. ज्यामुळे गाडीला आग लागू शकत नाही.या गाडीचे टायर सुध्दा खास आहेत त्यामुळे ही गाडी कधीच पंक्चर होऊ शकत नाही. त्याचबरोबर आतील भागात स्टील प्लेटिंग करण्यात आले आहे. म्हणजे टायरचा ब्लास्ट झाला तरी गाडीला वेगात पळवता येईल. ‘द बीस्ट’ मध्ये पुढील भागात नाईट व्हिजन कॅमे-याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे अंधारातदेखील गाडीमध्ये बसलेल्यांना बाहेरच्या हालचालीवर नजर ठेवता येईल.
14