महागाईवरच्या प्रश्नामुळं संतापले अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन; पत्रकाराला शिवी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल

पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर चिडलेल्या बायडेन यांनी पत्रकाराला शिवी दिली.

(संग्रहित फोटो)

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ऑन माईक पत्रकाराला शिवी दिल्याचा प्रकार घडला आहे. पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर चिडलेल्या बायडेन यांनी त्याला शिवी दिली. बायडेन शिवी देताना माईक सुरू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही, त्यामुळे ते रेकॉर्ड झालं आणि सध्या बायडेन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

जो बायडेन यांना सोमवारी एका पत्रकाराने महागाई संदर्भात प्रश्न विचारले. पत्रकाराचा प्रश्न ऐकून ७९ वर्षीय बायडेन संतापले आणि त्यांनी पत्रकाराला शिवीगाळ केली. यावेळी माईक बंद नाही, याची कल्पना बायडेन यांना नव्हती. त्यामुळे ते जे बोलले ते रेकॉर्ड झालंय.

सोमवारी पत्रकार परिषदेनंतर पत्रकार खोलीतून बाहेर पडत होते. यावेळी ‘फॉक्स न्यूज’च्या पत्रकाराने बायडेन यांना महागाई ही राजकीय जबाबदारी आहे का?, असा असा प्रश्न विचारला. त्यावर अध्यक्ष बायडेन यांनी पत्रकाराला शिवी दिली. पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर थोडावेळ ते काहीच बोलले नाही. नंतर “ही एक खूप मोठी संपत्ती आहे. जास्त महागाई,” असं म्हणाले. त्यानंतर पत्रकाराकडे पाहून काय वेडा माणूस आहे, असं म्हणत त्यांनी son of a b**ch अशी शिवी दिली.

जेव्हा जो बायडेन यांनी शिवी दिली तेव्हा फॉक्स न्यूजचे पत्रकार पीटर डोसी देखील तिथे उपस्थित होते. परंतु तिथल्या आवाजामुळे बायडेन काय म्हणाले, ते त्यांना ऐकू आले नाही.  

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Us president joe biden insults fox news reporter as he asked question about inflation video viral hrc

Next Story
कर्नाटकमधील सात महिन्याच्या बाळाला झाला दुर्मिळ आजार; जगात केवळ १४ जणांना या आजाराने ग्रासलंय
फोटो गॅलरी