अमेरिकेच्या भारतातील राजदूतपदी लॉस एंजेलिसचे महापौर गार्सेटी?

भारतातील आधीचे राजदूत जस्टर यांची नुकतीच परराष्ट्र मंडळाचे फेलो म्हणून निवड करण्यात आली.

एरिक गार्सेटी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी भारतातील राजदूत पदासाठी लॉस एंजेलिसचे महापौर  एरिक गार्सेटी यांच्या नावाची शिफारस केली आहे.

आपण लॉस एंजेलिस शहराचा महापौर म्हणून ज्या वचनबद्धतेने व ऊर्जेने काम केले त्याच प्रकारे भारतात काम करू, अशी प्रतिक्रिया गार्सेटी यांनी दिली आहे. त्यांच्या नेमणुकीस सेनेटची मंजुरी मिळणे गरजेचे आहे.  भारतातील आधीचे राजदूत जस्टर यांची नुकतीच परराष्ट्र मंडळाचे फेलो म्हणून निवड करण्यात आली. बायडेन यांनी डिनाईस कॅम्पबेल वॉवेर यांची नेमणूक मोनॅकोचे राजदूत म्हणून केली आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Us president joe biden los angeles mayor eric garcetti name recommended for ambassador akp

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या