scorecardresearch

Premium

जो बायडेन यांनी मानवी हक्क, माध्यम स्वातंत्र्यावर मोदींशी केली चर्चा; व्हिएतनाममध्ये म्हणाले, “त्यांच्याशी बोलताना…!”

बायडेन म्हणतात, “गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आले होते. तिथून पुढे आता…!”

joe biden pm naredra modi
जो बायडेन यांचा व्हिएतनाममध्ये माध्यमांशी संवाद! (फोटो – रॉयटर्स)

नुकतीच राजधानी दिल्लीत जी २० शिखर परिषद संपन्न झाली. या परिषदेमध्ये युक्रेनसारख्या गुंतागुंतीच्या मुद्द्यावर सर्व सदस्यांमध्ये एकमत घडवून आणल्याची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकमेकांशी सुहास्यवदनाने झालेल्या चर्चांचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. मात्र, जी २० परिषदेनंतर व्हिएतनाम दौऱ्यावर माध्यमांशी बोलताना जो बायडेन यांनी भारतातील मानवी हक्कांसंदर्भात, माध्यम स्वातंत्र्याविषयी चिंता व्यक्त केली आहे.

जी २० परिषदेच्या निमित्ताने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केल्याचं जो बायडेन म्हमाले यामध्ये भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी नमूद केलं. मात्र, त्याचवेळी मानवी हक्कांचा आदर राखण्याचं महत्त्वही आपण अधोरेखित केल्याचं ते म्हणाले.

PM Narendra Modi
“२०२९ मध्येही नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील, कारण..”; केंद्रातल्या बड्या मंत्र्याचं भाकित
nafe singh rathee
हरियाणामध्ये गोळ्या झाडून हत्या झाली ते आयएनएलडी प्रदेशाध्यक्ष नफेसिंह राठी कोण होते?
Kamal nath to joiN bjp
कमलनाथ भाजपाच्या वाटेवर, पण १९८४ च्या दंगलीमुळे अडचण; वाचा ४० वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?
sarwan singh pandher
‘आम्ही पाकिस्तानमधून नाही आलो’, पोलीस दलाच्या कारवाईनंतर शेतकरी नेत्याचे विधान

“बलशाली देशाच्या निर्मितीतील माध्यम स्वातंत्र्याचं महत्त्व”

“मी हे नेहमीच करतो. या दौऱ्यात मी मोदींशी सविस्तर चर्चा केली. यात मानवी हक्कांचा आदर राखण्याचं महत्त्व मी त्यांच्याशी बोलताना अधोरेखित केलं. तसेच, नागरी समाज व मुक्त माध्यमे एक बलशाली देश निर्माण करण्यात किती महत्त्वाची भूमिका बजावतात यावरही मी त्यांच्याशी बोललो”, असं जो बायडेन यांनी व्हिएतनामच्या हनॉईमध्ये आपल्या संभाषणात नमूद केलं. “आम्हाला खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत”, असंही बायडेन यांनी यावेळी नमूद केलं.

G20 Summit: काँग्रेसची टीका, पण शशी थरूर यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक; म्हणाले, “हे अशक्य वाटत होतं!”

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार!

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या पहिल्याच भारतभेटीमध्ये मिळालेल्या पाहुणचारासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच आभार मानले आहेत. “जी २० परिषदेचं आयोजन व तिथे सर्व सदस्य राष्ट्र प्रमुखांची करण्यात आलेली उत्तम व्यवस्था यासाठी मी पुन्हा एकदा मोदींचे आभार मानतो. गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आले होते. तिथून पुढे आता दोन्ही देशांमधील संबंध अधिक चांगले कसे करता येतील, यावर आम्ही सविस्तर चर्चा केली”, असंही बायडेन म्हणाले.

पत्रकारांना प्रश्न विचारण्यास नकार!

एकीकडे माध्यम स्वातंत्र्याविषयीचा मुद्दा चर्चेत असताना दुसरीकडे शुक्रवारी दिल्लीत मोदी व बायडेन यांच्यातील चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वारंवार मागणी करूनही पत्रकारांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली नव्हती. “ही भेट पंतप्रधानांच्या घरी होत आहे. ही काही नेहमीसारखी पंतप्रधानांच्या कार्यालयात झालेली द्विपक्षीय भेट नव्हे”, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलिवन यांनी दिल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसनं सीएनएनच्या हवाल्याने दिली आहे.

संयुक्त निवेदनात काय?

दरम्यान, दोन्ही नेत्यांनी भेटीनंतर काढलेल्या संयुक्त निवेदनातही मानवी हक्क, लोकशाही, स्वातंत्र्य या मूल्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. “स्वातंत्र्य, लोकशाही, मानवी हक्क, समावेशकता, बहुविविधता, सर्वांना समान संधी या गोष्टी आपल्या देशांच्या यशासाठी महत्त्वाच्या आहेत. या मूल्यांमुळेच आपले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतात”, असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Us president joe biden says raised human rights free press issue with pm narendra modi pmw

First published on: 11-09-2023 at 12:55 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×