“मुलं सांभाळण्याचा खर्च परवडत नव्हता”; अमेरिकेच्या अध्यक्षांनी मांडली ‘या’ पालकांची व्यथा

१९७२ मध्ये बायडेन यांच्या पहिल्या पत्नी आणि मुलीचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता

Us president joe biden single parenthood struggle 1st wifes death accident

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या मागासलेल्या बाल संगोपन सेवांमधील बदलांसाठी वैयक्तिक आवाहन केले आहे. अपघातामध्ये पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाल्यानंतर पालकांना कामासाठी करावा लागत असणारा संघर्षाचे महत्त्व दिसून आल्याचे जो बायडेन यांनी म्हटले आहे.

आपल्या राजकीय प्रवासादरम्यान, बायडेन यांना वैयक्तिकरित्या खूप त्रास सहन करावा लागला होता. १९७२ मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नी आणि मुलीचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातामध्ये त्यांची दोन मुले हंटर आणि ब्यू कार अपघातातून बचावले होते. त्यावेळी एकल पालक असताना आलेले अनुभव बायडेन यांनी कनेक्टिकटमधील भाषणादरम्यान सांगितले. एका सिनेटच्या पगारावर मुलं सांभाळण्याचा खर्च परवडत नव्हता, त्यामुळे मला वॉशिंग्टन आणि डेलावेअर दरम्यान दररोज प्रवास करावा लागत होता असे बायडेन म्हणाले. राज्याच्या राजधानी हार्टफोर्डमधील बाल संगोपन केंद्रात बायडेन म्हणाले, “ज्या लोकांना मदतीची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी हे किती कठीण आहे याची मला जाणीव त्यावेळी झाली.”

यावेळी त्यांनी पत्नी नीलिया आणि त्यांची एक वर्षाची मुलगी नाओमी यांचा मृत्यूबद्दल पहिल्यांदाच सार्वजनिकपणे भाष्य केले. पण राष्ट्राध्यक्षांनी या भयानक घटनेचा एक शिकण्याचा क्षण म्हणून पुनरुच्चार केला. ज्यामुळे त्यांना जाणीव झाली की बहुतेक अमेरिकेतील लोकांकडे विस्तारित कुटुंबाची मदत नाही ज्याचा त्यांना फायदा झाला नाही जेव्हा ते कुटुंब वाढवण्यासाठी धडपडत होते. “मला मुलांची काळजी घेण्याची आर्थिक क्षमता नसल्याच्या चिंतेची फार पूर्वीपासून जाणीव आहे,” असे बायडेन म्हणाले.

ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट म्हणते की, जगातील ३७ प्रमुख विकसित देशांपैकी दोन देशांच्या तुलनेत अमेरिका बालपणाच्या शिक्षणात आणि अर्थव्यवस्थेच्या आकारासाठी कमी गुंतवणूक करतो. हार्टफोर्डचे डेमोक्रॅटिक महापौर ल्यूक ब्रॉनिन यांच्या मते, कनेक्टिकटमधील सरासरी कुटुंबासाठी बाल संगोपनाची किंमत  १६,००० डॉलर आहे. ज्यांनी बायडेन चाईल्ड केअर अजेंडाला “गेम चेंजर” म्हटले आहे.

“कोट्यवधी अमेरिकन पालक, विशेषत: माता, मुलांची काळजी घेऊ शकत नसल्यामुळे ते कार्यशक्तीचा भाग होऊ शकत नसल्यास आपण जगात कशी स्पर्धा करू शकतो?” असे बायडेन म्हणाले.

बायडेन यांनी कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या अमेरिकन लोकांसाठी फेडरल सबसिडीसह अंतर कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ज्यात कुटुंबांच्या बालसंगोपन खर्च त्यांच्या उत्पन्नाच्या सात टक्के मर्यादित करतील. बायडेन यांना बाल संगोपन केंद्रांना मोठी सबसिडी पुरवायची आहे. उद्योगात काम करणाऱ्यांसाठी वेतन वाढवायचे आहे, आणि सहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठीच्या कर्जाचे प्रमाण वर्षातून २,००० ते ३,००० डॉलर पर्यंत वाढवायचे आहे.

“अमेरिकन लोकांविरुद्ध पैज लावणे करणे कधीही चांगले नाही. अमेरिकेची लोकशाही काम करते हे जगाला दाखवण्याची वेळ आली आहे,” असे बायडेन म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Us president joe biden single parenthood struggle 1st wifes death accident abn

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य