अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील चर्चेची दुसरी फेरी भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे पार पडली. यावेळी अध्यक्षपदाचे प्रतिस्पर्धी उमेदवार हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात महिला, ओबामाकेअर, इमेल्स, कर व्यवस्था, सिरीया- रशिया देशांबाबतची भूमिका आणि उर्जा धोरण अशा विविध मुद्द्यांवरून संघर्ष झालेला पाहायला मिळाला. या फेरीत दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी पूर्वीपेक्षा कसून तयारी केल्याचे दिसत होते. संपूर्ण चर्चेचा विचार केल्यास हिलरी क्लिंटन त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा मुद्दा मांडत होत्या, तर ट्रम्प त्यांचा प्रत्येक मुद्दा खोडू पाहत होते. हिलरी यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. हिलरी यांची निर्णय क्षमता इतकी वाईट आहे की त्या कधीही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाहीत, अशी टीका यावेळी ट्रम्प यांनी केली.
एका न-नायकाचं वस्त्रहरण!
दरम्यान, ट्रम्प यांनी २००५ साली एका रेडिओ निवेदकाला दिलेल्या मुलाखतीचा मजकूर प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प आज काय बोलणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या मुलाखतीत ट्रम्प यांनी महिलांविषयी असभ्य भाषा वापरल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या अनेक नेत्यांनी ट्रम्प यांचा पाठिंबा काढून घेत ट्रम्प यांनी पुढील महिन्यातील अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, २००५ साली रेकॉर्ड करण्यात आलेली ध्वनिचित्रफीत खासगी गप्पा होत्या, त्याबद्दल मी खरचं खेद व्यक्त करतो, असे सांगत ट्रम्प यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हिलरी क्लिंटन यांनी या मुद्द्यावरून ट्रम्प यांना लक्ष्य करत ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होण्याच्या पात्रतेचे नसल्याचे सांगितले. अमेरिकेतील अनेक नागरिकांना ट्रम्प यांची भीती वाटते. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यास हे लोक देश सोडून जातील, असे हिलरी यांनी म्हटले. या चर्चेदरम्यान उपस्थित नागरिकांनी इस्लामफोबिया, उर्जा धोरण आणि कर व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले. मात्र, अमेरिकेची लढाई इस्लामबरोबर नसल्याचे हिलरी यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय शर्यतीतून माघारीस ट्रम्प यांचा नकार

BJP youth leader in contact with Sharad Pawar group for candidacy from Raver
रावेरमधून उमेदवारीसाठी भाजपचा युवानेता शरद पवार गटाच्या गळाला?
Mira-Bhainder NCP district president Mohan Patil arrested
राष्ट्रवादी मिरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांना अटक, शैक्षणिक संस्थेत घोटाळा केल्याचा आरोप
odisha bjp lok sabha campaign
अभिनेते आणि खासदार अनुभव मोहंती आता भाजपाच्या मंचावर
Harshwardhan jadhav
“मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा एकमेव आमदार”, हर्षवर्धन जाधव लढवणार लोकसभा निवडणूक; पण कोणत्या पक्षातून?