भारताने पाकिस्तानच्या मुद्द्यावरुन खडे बोल सुनावल्यानंतर अमेरिकेचं प्रत्युत्तर, म्हणाले "आमच्यासाठी पाकिस्तान..." | US Reply to Indias Foriegn Minister S Jaishankar over Remarks On F16 Deal With Pakistan sgy 87 | Loksatta

‘कुणाला मूर्ख बनवताय?’ भारताने पाकिस्तानच्या मुद्द्यावरुन खडे बोल सुनावल्यानंतर अमेरिकेचं प्रत्युत्तर, म्हणाले “आमच्यासाठी…”

अमेरिकेचं भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना प्रत्युत्तर, म्हणाले “आमच्यासाठी भारत आणि पाकिस्तान…”

‘कुणाला मूर्ख बनवताय?’ भारताने पाकिस्तानच्या मुद्द्यावरुन खडे बोल सुनावल्यानंतर अमेरिकेचं प्रत्युत्तर, म्हणाले “आमच्यासाठी…”
अमेरिकेचं भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना प्रत्युत्तर

पाकिस्तानला एफ १६ विमानांसाठी देण्यात आलेल्या आर्थिक मदतीवरुन भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी खडे बोल सुनावल्यानंतर अमेरिकेने प्रत्युत्तर दिलं आहे. भारत आणि पाकिस्तान दोघेही अमेरिकेचे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भागीदार आहेत, असं बायडन प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

एस जयशंकर यांनी रविवारी वॉशिंग्टनमध्ये भारतीय-अमेरिकी समुदायासाठी आयोजित कर्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांना अमेरिकेने पाकिस्तानला एफ-१६ विमानांच्या ताफ्यासाठी ४५० दशलक्ष डॉलर्सचं पॅकेज दिल्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध असे आहेत, ज्यामधून ना पाकिस्तानला फायदा होत आहे, ना अमेरिकेचे हित होत आहे असं म्हटलं होतं.

अमेरिकेचं प्रत्युत्तर –

“आम्ही पाकिस्तान आणि भारतासोबत असणाऱ्या संबंधांची तुलना करत नाही. दोघेही वेगवेगळ्या मुद्द्यांवर आमचे भागीदार आहेत,” असं गृहविभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

“आम्ही दोघांकडेही आमचे भागीदार म्हणून पाहतो, कारण अनेक बाबतीत आमच्यात सामायिक मूल्ये आहेत. अनेक मुद्द्यांवर आमचे हेतूही समान आहेत. भारत आणि पाकिस्तानसोबत असणाऱ्या संबंधाना स्वत:चा आधार आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

कुणाला मूर्ख बनवताय? पाकिस्तानला लढाऊ विमानं देण्यावरून परराष्ट्र मंत्र्यांचा अमेरिकेला खडा सवाल

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं “दोन्ही शेजारी राष्ट्रांमधील संबंध सुधारावेत यासाठी आम्ही शक्य ते सर्व करु इच्छित आहोत. त्यामुळे हा मुद्दाही महत्त्वाचा आहे”.

एस जयशंकर काय म्हणाले आहेत?

“एकीकडे दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासाठी आपण हे करत आहोत असं सांगायचं आणि दुसरीकडे एफ-१६ सारखी लढाऊ विमानं कुठे आणि कशासाठी दिली जात आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. अशो गोष्टी सांगून तुम्ही इतरांना मूर्ख बनवत नाही आहात,” अशी टीका एस जयशंकर यांनी केली होती. “अमेरिकेची धोरणं तयार करणाऱ्यांशी बोलण्याची संधी मिळाली, तर मी नक्कीच त्यांना ते काय करत आहेत हे दाखवून देईन,” असंही ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण : दाऊदच्या माहितीसाठी बक्षीस म्हणजे काय?

संबंधित बातम्या

Shraddha Murder Case: आफताब पूनावालावर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय
विश्लेषण: तीन घुमट, एक बस-स्टॉप आणि राजकीय खडाजंगी; म्हैसूरमधील बस स्थानकामुळे निर्माण झालेला वाद नेमका काय?
Shraddha Walkar Murder: श्रद्धाची अंगठी, केसांचे बुचके अन् गुजरात कनेक्शन; आफताबसंदर्भात नवे धक्कादायक खुलासे
VIDEO : भारतीय लष्कराला मिळाला ‘अर्जुन’, पाकिस्तानातून येणाऱ्या ड्रोनची करणार ‘शिकार’
क्रूरतेची हद्द! जंगलात नेऊन सेक्स करायला सांगितलं, नंतर अंगावर फेव्हिक्विक ओतलं अन्…; घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मोठी बातमी: अवघ्या दोन महिन्यातच तुकाराम मुंढेंची बदली
“…तेव्हा नाही का वाटली लाज?”; उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंनी चक्क सादर केली कविता
सुजलेला चेहरा, अशक्तपणा अन्…; अभिनेत्री श्रुती हसनची अशी अवस्था का झाली? आजारपणातील फोटो शेअर करत म्हणाली…
“…भगतसिंह कोश्यारींचं अजूनही लग्न झालं नाही”, ‘त्या’ विधानावरून राज ठाकरेंची टोलेबाजी!
Video: ‘बिग बॉस’च्या घरात जेवणावरुन वाद, अर्चनाने शिवच्या भरलेल्या ताटामधून चपाती उचलली अन्…; व्हिडीओ व्हायरल