US-Iran Conflict Latest Update : अमेरिका आणि इस्रायलने इराणमध्ये केलेल्या हल्यानंतर या मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. यादरम्यान अमेरिकेच्या लष्कराने इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअर (IRGC) चे मुख्यलय उद्ध्वस्त केल्याची पुष्टी केली आहे. तसेच अमेरिकन सेट्रल कमांड (CENTCOM) ने आयआरजीसी गेल्या ४७ वर्षांमध्ये १ हजाराहून अधिक अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये CENTCOM ने या कारवाईचे वर्णन करताना अमेरिकेच्या हल्ल्यात ‘नागाचा फणा ठेचला’ गेला असल्याचे म्हटले आहे. तसेच अमेरिकेकडे जगातील सर्वात शक्तिशाली लष्कर असल्याचा दावाही करण्यात आला आहे. इतकेच नाही अमेरिकेने आरजीसीकडे आता मुख्यालय नसल्याचेही म्हटले आहे.

अमेरिकन लष्कराने नेमकं काय म्हटलं आहे?

“इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरने गेल्या ४७ वर्षांत १००० हून अधिक अमेरिकन नागरिकांची हत्या केली आहे. काल, अमेरिकेने मोठ्या प्रमाणात केलेल्या हल्ल्यात नागाचा फणा ठेचण्यात आला. अमेरिकेकडे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य आहे, आणि आयआरजीसीकडे आता मुख्यालय उरलेले नाही,” असे CENTCOM एका निवेदनात म्हटले आहे.

इस्रायली लष्कराने इराणी लष्कराच्या अनेक कमांड सेंटर्सवरती हल्ले केल्याची माहिती दिली आहे, ज्यामध्ये आरजीसीचे काही सेंटर, गुप्तहेर विभागाची मुख्यालये, आयआरजीसी एअर फोर्स कमांज सेंटर, इटर्नल सेक्युरिटी मुख्यालय यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

इस्रायलने जारी केलेल्या निवेदनानुसार, या हल्ल्यांमुळे इराणच्या कमांड-अँड-कंट्रोल क्षमतांना मोठा धक्का बसला असून, महत्त्वाच्या ठिकाणी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांचा खात्मा झाला आहे.

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा शनिवारी मृत्यू झाल्यानंतर ही लष्करी कारवाई रविवारी देखील सुरूच होती.

इस्रायलने इराणच्या राजधानीवर हल्ले केंद्रीत केल्याचे दिसून आले. यानंतर याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल, आखाती प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळ, सौदी अरेबियाची राजधानी आणि दुबईवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले.

दरम्यान खामेनी यांच्या मृत्यूनंतर अयातुल्ला अली रझा अराफी यांची इराणच्या नेतृत्व मंडळात न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खामेनी यांच्यानंतर नवे नेतृत्व नियुक्त होईपर्यंत ते हंगामी कारभार सांभाळतील.

इस्रायलच्या हवाई दलाने केलेल्या अचूक, मोठ्या प्रमाणावरील हल्ल्यात अली खामेनी यांना लक्ष्य करण्यात आले. गुप्तहेरांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारावर मोहीम राबविण्यात आली असे इस्रायलच्या संरक्षण दलाने स्पष्ट केले. ‘