scorecardresearch

Premium

भारतीयांची व्हिसा प्रतीक्षा कमी करावी; अमेरिकी सिनेटरची राष्ट्राध्यक्षांना विनंती

अमेरिकेच्या व्हिसासाठी पहिल्यांदा मुलाखतीची वेळ मिळण्यास भारतीय नागरिकांना सध्या सरासरी ४५० ते ६०० दिवस प्रतीक्षा करावी लागते.

us senator urge biden admin to address visa wait time issue in india on priority basis
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- इंडियन एक्स्प्रेस (file photo)

शिंग्टन : भारतीय नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्यासाठी जास्त काळ प्रतीक्षा करावी लागते. ही समस्या दूर करण्यासाठी अध्यक्ष जो बायडेन यांनी प्राधान्याने लक्ष घालावे, अशी आग्रही विनंती सिनेटर बॉब मेनेंडेझ आणि काँग्रेसमन मायकेल वॉल्ट्झ यांनी केली आहे.

अमेरिकेच्या व्हिसासाठी पहिल्यांदा मुलाखतीची वेळ मिळण्यास भारतीय नागरिकांना सध्या सरासरी ४५० ते ६०० दिवस प्रतीक्षा करावी लागते. भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार असून लोकांच्या एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्काने त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली जाते, याकडे मेनेंडेझ आणि वॉल्ट्झ यांनी बायडेन प्रशासनाचे लक्ष वेधले. मेनेंडेझ हे सिनेटच्या परराष्ट्र धोरण समितीचे अध्यक्ष आहेत, तर वॉल्ट्झ हे अमेरिकेचे कायदेमंडळ असलेल्या काँग्रेसच्या भारतविषयक धोरणांकडे लक्ष देणाऱ्या हाऊस इंडिया कॉकसचे सह-अध्यक्ष आहेत. या दोघांनी काँग्रेसच्या दोन स्वतंत्र चर्चादरम्यान भारतीयांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्यासाठी ६०० दिवसांपर्यंत प्रतीक्षा का करावी लागते, असा प्रश्न उपस्थित केला.

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

२१ व्या शतकातील अमेरिकेचे भारताशी असलेले आर्थिक, धोरणात्मक, सुरक्षाविषयक संबंध अतिशय महत्त्वाचे आहेत असे मेनेंडेझ म्हणाले. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर येत असताना आपण ही समस्या सोडवण्यासाठी काय करणार आहोत, असा प्रश्न वॉल्ट्झ यांनी विचारला.

ही समस्या सोडवण्यासाठी परराष्ट्र विभाग परिश्रम घेत असून त्यासाठी अनेक उपाय करण्यात आल्याचे परराष्ट्र साहाय्यकमंत्री रेना बिटर यांनी मेनेंडेझ आणि वॉल्ट्झ यांना सांगितले.

भारतामधून व्हिसासाठी नेहमीच जास्त मागणी राहिली आहे. आम्ही या वर्षी १० लाख भारतीयांना व्हिसा देणार आहोत. यासाठी आम्ही अत्यंत कार्यक्षमतेने पावले टाकत आहोत.

– रेना बिटर, परराष्ट्र साहाय्यकमंत्री

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 04:45 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×