अमेरिकेने भारतासह एकूण २० देशांमधून आयात करण्यात येणाऱ्या काही विशेष औषधांवर आणि त्याच्याशी संबंधित सामुग्रीवर कुठलाही टॅरिफ लागणार नाही असा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या कॉमर्स डिपार्टमेंटने जी नोटीस जारी केली आहे त्यात ही माहिती दिली आहे.हा निर्णय त्यावेळी घेण्यात आला आहे जेव्हा वॉशिंग्टनने २९ सप्टेंबरपासून काही पेटेंटेड फॉर्मास्युटिकल इंपोर्ट आणि त्याच्याशी संबंधित सामुग्रीवर १०० टक्के टॅरिफ लावण्याची तयारी सुरू केली होती. ही औषधं जुने आजार, वंध्यत्व, सेल आणि जीन थेरेपी, एंटीबॉडी ड्रग, तसंच पशुंच्या औषधांवर आणि त्याच्या सामुग्रीवर हा कर लागणार नाही.
भारताव्यतिरिक्त, झीरो टॅरिफ असलेल्या इतर देशांमध्ये अर्जेंटिना, बांगलादेश, कंबोडिया, इक्वाडोर, एल साल्वाडोर, युरोपियन युनियन, ग्वाटेमाला, इंडोनेशिया, जपान, जॉर्डन, मलेशिया, उत्तर मॅसिडोनिया, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड, लिक्टेनस्टाइन, तैवान, थायलंड, ब्रिटन आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे. वर्ल्ड कस्टम्स ऑर्गनायझेशनच्या मते, अॅड व्हॅलोरेम टॅरिफ म्हणजे कर आकारल्या जाणाऱ्या वस्तूंच्या आर्थिक मूल्याच्या ठरावीक टक्केवारीनुसार आकारला जाणारा कर. पत्रकानुसार वरील देशांमधून येणाऱ्या पात्र उत्पादनांवर शून्य टक्के शुल्क लागू होऊ शकते, कारण या देशांचा अमेरिकेसोबत सध्या व्यापार व सुरक्षा विषयक करार आहे किंवा असा करार लवकरच होणार आहे.
२ एप्रिल रोजी ट्रम्प यांनी अमेरिकेत देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पेटंट असलेली औषधे, बायोलॉजिक्स आणि संबंधित घटकांच्या आयातीवर शुल्क लावण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार, निर्दिष्ट पेटंट असलेल्या औषधांवर आणि घटकांवर १०० टक्के शुल्क लावण्यात आले. एका परिशिष्टात (Annex) नमूद केलेल्या कंपन्यांसाठी हे शुल्क ३१ जुलैपासून लागू झाले असून, इतर पात्र कंपन्यांसाठी ते २९ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
