रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांमध्ये देशाच्या अर्थसंकल्पावरून मतैक्य न झाल्यामुळे अमेरिकत निर्माण झालेली परिस्थिती दुसऱया दिवशीही कायम आहे. अमेरिकी सरकारच्या शटडाऊनमुळे सुमारे दहा लाख सरकारी कर्मचाऱयांवर बिनपगारी घरी बसण्याची वेळ ओढावली आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या सर्व परिस्थितीला विरोधी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केला. रिपब्लिकन पक्षाच्या बेफिकीरपणामुळे देशावर संकट ओढावल्याचे ओबामा यांनी म्हटले आहे. 
महासत्तेतील मुखंड
शटडाऊनचा कालावधी जितका वाढेल, तितका त्याचा परिणाम अजून गंभीर होत जाईल. अनेक कुटुंबीयांना त्याची झळ सोसावी लागेल. देशाच्या अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसेल, असे ओबामा यांनी मंगळवारी म्हटले होते. अमेरिकी कॉंग्रेसने या अर्थसंकल्पाला तातडीने मंजुरी देऊन शटडाऊनपासून देशवासियांची सुटका करावी, असे आवाहन ओबामा यांनी केले आहे.
अमेरिकेची कोंडी
अमेरिकेत तब्बल १८ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा आर्थिक चक्रे अंशत: थंडावली, देशाच्या अर्थसंकल्पावर, रिपब्लिकन व डेमोक्रॅट या दोन पक्षात अध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या ‘ओबामा केअर’ या आरोग्य सुधारणा योजनेसाठी तरतुदी करण्याविषयी मतैक्य न झाल्याने आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवर ही आफत आली. कुठल्याही पक्षाने माघार घेण्यास नकार दिल्याने अखेरच्या क्षणी तडजोडीचे मार्ग संपल्याने अखेर अमेरिकेचे राज्यशकट हाकणाऱ्या व्हाइट हाऊसने संघराज्य सरकारच्या काही संस्था बंद करण्याची घोषणा मंगळवारी केली.
अमेरिका संकटात