अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी करोना विषाणूचा उगम कुठून झाला हे आम्हाला कधीच कळणार नाही असे म्हटले आहे. गुप्तचर संस्थांनी त्यांच्या एका नवीन अहवालात करोना विषाणू प्राण्यांकडून माणसांमध्ये येण्याबाबत किंवा प्रयोगशाळेतून गळती होण्याबाबत तपशीलवार माहिती दिली आहे. यूएस डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स (ODNI) च्या कार्यालयाने म्हटले आहे की नैसर्गिक उत्पत्ती आणि प्रयोगशाळेतील गळती हे दोन्ही गृहितके आहेत. पण कोणती शक्यता जास्त आहे किंवा त्यांचे निश्चित मूल्यांकन केले जाऊ शकते का याबद्दल विश्लेषक असहमत आहेत.

या अहवालामध्ये त्या सूचना देखील फेटाळल्या आहेत ज्यात करोना विषाणूचे जैव-शस्त्र म्हणून वर्णन केले गेले होते. या सिद्धांताच्या समर्थकांना वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये थेट प्रवेश नाही. हा अहवाल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ऑगस्टमध्ये जारी केलेल्या ९० दिवसांच्या पुनरावलोकनाचा पुढील भाग आहे.

काही अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी करोना विषाणूची उत्पत्ती निसर्गात झाली आहे याचे जोरदार समर्थन केले होते. पण याची पुष्टी झाली नाही. ओडीएनआयच्या अहवालात चार गुप्तचर संस्था आणि एका संस्थेला कमी प्रमाणात खात्री आहे की करोना विषाणूची उत्पत्ती संक्रमित प्राणी किंवा संबंधित विषाणूपासून झाली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी विश्वास व्यक्त केला आहे की, ते नवीन माहितीशिवाय करोना विषाणूच्या उत्पत्तीचे निश्चित स्पष्टीकरण देऊ शकणार नाहीत.

करोना विषाणूच्या उत्पत्तीच्या तपासात चीनने जागतिक आरोग्य संघटनेला सहकार्य केले नाही, ज्यामुळे शी जिनपिंग सरकारला टीकेला सामोरे जावे लागले आहे. आतापर्यंत चीनने या नवीन अहवालावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा कोविड -१९ चा “चायना व्हायरस” म्हणून उल्लेख केला होता. काही अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी या विषाणूची उत्पत्ती निसर्गात झाली या स्पष्टीकरणाचे जोरदार समर्थन केले होते. पण याची पुष्टी कमी झाली आहे आणि अलिकडच्या काही महिन्यांत हा विषाणू मोठ्या प्रमाणावर आणि नैसर्गिकरित्या वन्य प्राण्यांमध्ये पसरला आहे.