चीनचा दावा; सीमावाद चर्चेने सोडविण्याचा निर्धार

भारत आणि चीन यांच्यात तणाव निर्माण करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याची टीका सोमवारी चीनने केली. मात्र उभय देश चर्चेच्या शांततापूर्ण मार्गाने सीमावाद सोडवत असून त्यांच्या प्रयत्नांचा अमेरिकेने आदर करावा, असे आवाहन चीनने केले.

भारत-चीन सीमेवर चीन मोठय़ा प्रमाणावर सैन्य तैनात करीत असल्याचा अमेरिकी अहवालातील दावा चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी खोडून काढला. सध्या भारत-चीन सीमेवर शांतता आहे. तिथे कोणताही तणाव नाही. सीमेवर शांतता राखण्याचे महत्त्व दोन्ही देशांना समजते. यामुळे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाची अनेक विधाने आणि अहवाल निराधार व भारत-चीन यांच्यात तणाव निर्माण करणारे आहेत, असे चीनने म्हटले आहे.

सीमाप्रश्नी भारत आणि चीन यांच्यात गेल्या महिन्यात १९व्या फेरीतील चर्चा झाली होती.