आपल्याला आकाशात दिसणारा चंद्र ( Moon Drifting Away) हा अनेक दशकांपासून कलाकार, कवी, गणित तज्ज्ञ, खगोल तज्ज्ञ, लहान मुलं या सगळ्यांनाच आपलंसं करणारा ठरला आहे. आपल्याकडे तर चंद्राला तर भाऊ म्हणून ओवाळलंही जातं. 'चांदोबा चांदोबा भागलास का?', 'चांद मातला', 'हा चंद्र जिवाला लावी पिसे..' अशी अनेक गाणीही प्रसिद्ध आहेत. मात्र आता एक अभ्यास असं सांगतो आहे की आपल्याला आपला वाटणारा हा चंद्र ( Moon ) पृथ्वीपासून हळूहळू दूर जातो आहे. या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की चंद्र दरवर्षी ३.८ सेमी या गतीने पृथ्वीपासून दुरावतोय. चंद्राचं ( Moon ) पृथ्वीपासून दूर जाणं कायम राहिलं तर आपल्या पृथ्वीवरचा दिवस २४ ऐवजी २५ तासांचा होईल. हा अभ्यास करणाऱ्यांनी असाही दावा केला आहे की एक काळ असाही होऊन गेला की पृथ्वीवरचा दिवस १८ तासांचा होता. आता हा नवा अभ्यास अहवाल समोर आला आहे. हे पण वाचा- लक्ष मनांच्या इंद्रगुहांत भटकणारा तो चंद्र…! विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठाचा अभ्यास काय सांगतो? अमेरिकेतील विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठातल्या एका टीमने चंद्राचा ( Moon ) सखोल अभ्यास केला आहे. त्या अभ्यास अहवालात त्यांनी हे निरीक्षण नोंदवलं आहे की पृथ्वीपासून चंद्र हळूहळू दूर जातो आहे. या विद्यापीठाचे प्राध्यापाक स्टीफन मेयर्स यांनी हे म्हटलं आहे की चंद्र पृथ्वीपासून जसाजसा दुरावला तसा परिणाम पृथ्वीवर झाला आहे. चंद्र पृथ्वीपासून दूर जाणं ही काही नवी बाब नाही. अनेक शतकांपूर्वीही अशाच घटना घडल्या. चंद्र ( Moon ) पृथ्वीपासून दूर गेल्याने पूर्वी एके काळी १८ तासांचा असलेला दिवस २४ तासांचा झाला. आता आमचा अभ्यास हे सांगतो की हा दिवस २५ तासांचा होऊ शकतो. चंद्राचा सखोल अभ्यास करण्यात आल्यानंतर निरीक्षण विस्कॉन्सिन मॉडिसन विद्यापीठाने यासाठी चंद्राचा ( Moon ) खूप सखोल अभ्यास केला आहे. तसंच आकाशात असलेल्या उपग्रहाकडून आलेल्या नोंदीही तपासल्या, तसंच वर्षानुवर्षे पृथ्वीवर असलेल्या डोंगरांचा, खडकांचाही अभ्यास त्यांनी केला. त्यावरुन हा निष्कर्ष काढला आहे की चंद्र ( Moon ) पृथ्वीपासून दूर जातो आहे. सध्याच्या घडीला पृथ्वी स्वतःभोवती फिरते ज्यासाठी २४ तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे पृथ्वीवर एक दिवस २४ तासांचा असतो. मात्र या अभ्यास अहवालात हा दावा करण्यात आला आहे की भविष्यात अशी वेळ येऊ शकते की हा कालावधी २५ तासांचा होईल. ज्यामुळे पृथ्वीवरचा दिवस २४ ऐवजी २५ तासांचा असेल. असं घडलं तर वर्ष हे ३६५ दिवसांऐवजी कमी दिवसांचं असेल. चंद्र पृथ्वीपासून जातो आहे दूर, काय सांगतो अमेरिकेतील विद्यापीठाचा अभ्यास? पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी २५ तास लागले तर वर्ष ३५० दिवसांचं? विस्कॉन्सिन मॉडिसन विद्यापीठातील अभ्यासकांच्या मते जर पृथ्वीवरचा दिवस हा २५ तासांचा झाला तर त्याचा परिणाम कालगणनेवरही होईल. सध्या पृथ्वीवर एक वर्ष ३६५ दिवसांचं असतं. ३६५ दिवस हा पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणारा कालावधी आहे. जर पृथ्वीवरचा दिवस २५ तासांचा झाला तर वर्ष ३६५ ऐवजी ३५० दिवसांचं होईल. कारण पृथ्वी ३५० दिवसांत सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण होईल. त्यामुळे जर पृथ्वीवरचा दिवस २५ तासांचा झाला तर पृथ्वीवरचं वर्ष ३६५ दिवसांऐवजी ३५० दिवसांचं असेल. या अभ्यासकांनी त्यांच्या अहवालात हेदेखील सांगितलं आहे की चंद्र पृथ्वीपासून लांब जाण्यासाठी २०० मिलियन वर्षांचा कालावधी लागेल. पृथ्वीपासून चंद्र लांब का जातो आहे? पृथ्वीचा वेग चंद्रामुळे ( Moon ) मंदावला आहे असंही हा अभ्यास सांगतो. त्यामुळे ही उलथापालथ घडते आहे. सध्याच्या घडीला चंद्र हा पृथ्वीपासून दरवर्षी दीड इंच किंवा ३.८ सेमीने लांब जातो आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.